Air Force Chief Revel Indside
देश विदेश

Air Chief Marshal A P Singh: कोण आहेत नवे हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग? ४० वर्षे सेवा, ५००० हून अधिक तास विमान उड्डाणाचा अनुभव गाठिशी...

Air Force Chief: एअर मार्शल एपी सिंग यांच्याकडे ५ हजार तास लढाऊ विमानाचं उड्डाण भरण्याचा अनुभव आहे.

Bharat Jadhav

एअर मार्शल एपी सिंग यांची आज एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्यानंतर नवीन हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती केली. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी फेब्रुवारी २०२३ पासून हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून काम पाहिले. एपी सिंग यांचा जन्म १९६४ साली ऑक्टोबर महिन्याच्या २७ तारखेला झाला. सिंग यांना १९८४ मध्ये हवाई दलाच्या फायटर पायलट स्ट्रीममध्ये नियुक्त करण्यात आले होते.

सुमारे ४० वर्षांच्या सेवेदरम्यान,त्यांनी विविध कमांड, स्टाफ, निर्देशात्मक आणि परदेशी नियुक्तींत्याची जबाबदारी संभाळलीय. एपी सिंग हे नॅशनल डिफेन्स अकादमी, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी, एअर ऑफिसर हा एक पात्र फ्लाइंग इंस्ट्रक्टर आणि एक प्रायोगिक चाचणी पायलट राहिलेत. ज्याला विविध प्रकारच्या स्थिर आणि रोटरी-विंग विमानांवर ५००० तासांपेक्षा जास्त उड्डाण भरण्याचा अनुभव आहे.

त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी रशियाच्या मॉस्को येथील ऑपरेशनल फायटर स्क्वाड्रन आणि फ्रंटलाइन एअर बेसवरील ऑपरेशननचं मॉस्को नेत्वृव केलं होतं. तसेच त्यांनी रशियाच्या मॉस्कोमध्ये चाचणी पायलट म्हणून MiG-29 अपग्रेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमचे नेतृत्व केलं होतं. ते नॅशनल फ्लाइट टेस्ट सेंटरमध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर (फ्लाइट टेस्ट) देखील होते आणि त्यांना लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, तेजसच्या फ्लाइट टेस्टिंगची जबाबदारी देण्यात आली होती.

त्याचबरोबर त्यांनी साउथ वेस्टर्न एअर कमांडमध्ये एअर डिफेन्स कमांडर आणि इस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. हवाई दलाच्या उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT