AIR-INDIA Flight Take off To Ukraine Saam Tv
देश विदेश

Russia-Ukraine Conflict: रशिया -युक्रेनच्या तणावात वाढ; भारतीयांना आणण्यासाठी AI चे विमान रवाना

भारतीय नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन सीमेवरील (Russia-Ukrain border) तणाव वाढणे ही गंभीर चिंतेची बाब आहे, असे भारताने (India) आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council) भावना व्यक्त करीत सर्व बाजूंनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान वाढता तणाव लक्षात घेता एअर इंडिया (AI) चे विशेष विमान आज रात्री युक्रेन (बॉरिस्पिल) विमानतळावरून (Ukraine (Boryspil) airport tonight) सुरक्षित परतण्यासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना परत घेऊन येईल. (russia ukraine conflict news in marathi)

एअर इंडियाचे पहिले विशेष विमान (AI-1946) युक्रेनहून (Ukraine) भारतात चालवण्यात येणारे तीनपैकी पहिले विशेष विमान आज रात्री भारतीय नागरिकांसह उड्डाण करेल, असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितल्याचे वृत्त ANI ने दिले आहे.

रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढल्याने संयुक्त राष्ट्रांची आपत्कालीन सुरक्षा परिषदेची बैठक झाली. या बैठकीत संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती (T.S. Tirumurti) म्हणाले, “रशियन फेडरेशनसह युक्रेनच्या सीमेवर वाढलेला तणाव हा गंभीर चिंतेचा विषय आहे. या घडामोडींमध्ये प्रदेशाची शांतता आणि सुरक्षा बिघडवण्याची स्थिती आहे. आम्ही सर्व बाजूंनी संयम ठेवण्याचे आवाहन करतो. आम्हाला खात्री आहे की हा प्रश्न संवादातूनच सोडवला जाऊ शकतो.

नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे. २० हजार हून अधिक भारतीय विद्यार्थी (Indian students) आणि नागरिक युक्रेनच्या सीमावर्ती भागांसह विविध भागांमध्ये राहतात. भारतीयांची सुरक्षा आमच्यासाठी महत्वाची ठरते, त्यास आम्ही प्राधान्य देत आहाेत.

"आम्ही सर्व बाजूंनी अत्यंत संयम ठेवून आणि परस्पर सौहार्दपूर्ण तोडगा लवकरात लवकर येण्याची खात्री करण्यासाठी राजनयिक प्रयत्न तीव्र करून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी आवश्यकतेवर जोर देतो असेही तिरुमूर्ती यांनी नमूद केले.

दरम्यान युक्रेनमधून मायदेशी परतण्याची इच्छा असलेल्या भारतीयांना घरी आणण्यासाठी एअर इंडियाचे (air india) एक विमान सोमवारी युक्रेनला रवाना झाले. युक्रेनमधील युद्धाच्या स्थितीत विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांसाठी युक्रेनमधून भारतात आणण्यासाठी एकूण तीन उड्डाणे असतील अशी घोषणा एअर इंडियाने यापुर्वीच केली हाेती.

एअर इंडियाने भारत आणि युक्रेन दरम्यान आज (ता.२२) , २४ आणि २६ फेब्रुवारीला विमानाची सुविधा उपलब्ध केली आहे. युक्रेनसाठी विशेष ऑपरेशनचा एक भाग म्हणून दिल्लीहून बोइंग ड्रीमलायनर AI-1947 उड्डाण केले आहे. त्याची क्षमता 200 पेक्षा जास्त आसनांची आहे. तसेच विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने ANI ला सांगितले की, "एक ड्रीमलायनर बोईंग B-787 ने सकाळी दिल्ली विमानतळावरून युक्रेन (बॉरिस्पिल) साठी उड्डाण केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

SCROLL FOR NEXT