plane crash Saam tv
देश विदेश

Ahmedabad Plane Crash: विमान अपघातातील 100 हून अधिक मृतदेह बाहेर काढले; आकडा वाढण्याची शक्यता, भारतीयांवर दु:खाचा डोंगर

Ahmedabad Plane Crash update : अहमदाबादमधील विमान अपघातातील १०० हून अधिक जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातात मृत पावलेल्या मृतांमध्ये लहान मुलांचाही देखील समावेश आहे.

Vishal Gangurde

अहमदाबाद : एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. गुजरातच्या अहमदाबादहून लंडनला निघालेलं विमान मेघानीनगरात कोसळलं. विमान टेक ऑफ घेताच १० मिनिटांत कोसळल्याची माहिती हाती आली आहे. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. आतापर्यंत दुर्घटनाग्रस्त विमानातून 100 हून जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 'दैनिक भास्कर' या वृत्त संस्थेने ही माहिती दिली.

मीडिया रिपोर्टनुसार, अहमदाबाद विमानतळावरून विमान AI-171 हे दुपारी १.३८ वाजता टेक ऑफ घेताच अवघ्या दोन मिनिटांत कोसळलं. या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली. या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांच्याशी चर्चा केली. या भीषण अपघातानंतर अहमदाबाद विमानतळ बंद करण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपानी देखील विमानात होते. दुर्घटना घडताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफ, सैनिक घटनास्थळी पोहोचले.

विमानात एकूण २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. विमानाचा अपघात होताच परिसरात खळबळ उडाली. या अपघाताचे भयावह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या विमानात २३० प्रवाशांपैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडीयन, ७ पौर्तुगील नागरिक विमानात होते.

अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये एकच धावाधाव झाली. अपघातानंतर पोलिस आणि प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि अपात्कालीन पथक मदतीसाठी धावले. गांधीनगरहून एनडीआरएफचे दोन पथक घटनास्थळी पोहोचले. त्यात ९० जवानांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भुंप्रेद्र पटेल आणि अहमदाबादचे पोलीस आयुक्त यांच्याकडून माहिती घेतली. या घटनेवर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी तातडीने मदतीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: डान्स क्लास लावण्याचा हट्ट, आई-वडिलांनी दिला नकार; मुलीनं संपवलं आयुष्य

Maharashtra Live News Update : वसईत अपहरणाचा प्रयत्न

Eknath Shinde : 'शेतकरी भिकारी नसून...' म्हणणाऱ्या कोकाटेंच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? वाचा

Tattoo Care : टॅटू काढल्यावर या 8 चुका टाळा, अन्यथा होईल पश्चाताप

Shilpa Shetty: 'ये चाँद सा रोशन चेहरा' शिल्पा शेट्टीच्या सौंदर्यावरून नजर हटणार नाही!

SCROLL FOR NEXT