Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंविरोधात मोठा डाव; पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता फोडला, वाचा सविस्तर

eknath shinde News : चंद्रहार पाटलांनी वस्तादच नाही तर आखाडाही बदलला आणि शिंदे गटात प्रवेश केला....त्यावरुन राऊतांनी खोचक टीका केलीय.. राऊत नेमकं काय म्हणाले आहेत? आणि चंद्रहार पाटलांनी साथ सोडल्याने ठाकरे गटाला किती फटका बसणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Eknath Shinde  news
Uddhav Thackeray And Eknath ShindeSaam Tv
Published On

लोकसभा निवडणूकीत ठाकरेंनी चंद्रहार पाटलांसाठी सांगलीचा आखाडा प्रतिष्ठेचा केला होता. इंडिया आघाडीत याच जागेवरुन झालेला वाद हा थेट दिल्ली दरबारीही पोहचला. ज्यांच्यासाठी ठाकरेंनी मित्रपक्षांना अंगावर घेतलं त्याच त्याच चंद्रहार पाटलांनी वर्षभरात ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना साथ दिलीय...त्यामुळे चंद्रहार पाटलांसाठी वस्ताद बनून विरोधकांना शिंगावर घेणाऱ्या संजय राऊतांनी चंद्रहार पाटलांच्या दारुण पराभवावर भाष्य करत त्यांना खोचक टोला लगावलाय.

Eknath Shinde  news
Kalyan Clash : कल्याणमध्ये पुन्हा मोठा राडा; व्यापारी आणि फेरीवाल्याचा भर रस्त्यात तमाशा, नेमकं काय घडलं?

खरंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रहार पाटलांनी संजय राऊतांच्या माध्यमातून ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटाने जोर लावला आणि काँग्रेसची नाराजी पत्करुन चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली... तर संजय राऊतांनी चंद्रहार पाटलांसाठी सभा घेत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला.. मात्र त्याच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतलाय...मात्र चंद्रहार पाटलांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानं नेमका किती फटका बसणार? पाहूयात...

Eknath Shinde  news
Raja Raghuvanshi Case : प्रेम राजवर होतं, मग राजाशी लग्न का केलं? सोनम रघुवंशीच्या सासूचा मोठा खुलासा, वाचा सविस्तर

पश्चिम महाराष्ट्रात ठाकरेंना फटका?

विटा जिल्हा परिषद गटात चंद्रहार पाटलांचं वर्चस्व

लोकसभा निवडणूकीत चंद्रहार पाटलांना 60 हजार मतं

चंद्रहार पाटलांनी पक्ष सोडल्यानं सांगलीतही नवं नेतृत्व उभं करावं लागणार

विधानसभा निवडणुकीतही सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये मोठी पिछेहाट

Eknath Shinde  news
Raja Raghuvanshi Case : जिथे हत्या केली, तिथेच हिशोब होणार; मध्यरात्री सोनमला शिलाँगला नेणार, नेमकं काय घडणार?

शिवसेनेच्या फुटीनंतर पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे गटाकडे तुल्यबळ नेतेच शिल्लक राहिले.. त्यातच आता सांगली जिल्ह्यातील नामवंत मल्ल चंद्रहार पाटलांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या तोंडावर नव्याने कार्यकर्त्यांची बांधणी करुन मुसंडी मारणार की चंद्रहार पाटलांना धोबीपछाड देऊन आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com