Air India  Saam TV
देश विदेश

Air India: धक्कादायक! एअर इंडियाच्या जेवणात आढळली ब्लेडसदृश्य वस्तू; प्रवाशाने फोटो शेअर करताच कंपनीने मागितली माफी

Air India Flight News: एअर इंडियाच्या विमानात जेवणात ब्लेडसदृश्य वस्तू आढळली होती. जेवणात ब्लेड आढळल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर आता एअर इंडियाने घटलेल्या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एअर इंडियाच्या जेवणात ब्लेडचा तुकडा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेंगळुरु ते सॅन फ्रान्सिस्को या विमानातील एका प्रवाशाच्या जेवणात हा ब्लेडचा तुकडा आढळला होता. मॅथुरेस पॉल असे त्या व्यक्तीचे नाव आहे. ते गेल्या आठवड्यात एअर इंडिया एआक १७५ फ्लाइटने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ऑर्डर केलेल्या जेवणात धातूची काहीतरी वस्तू सापडली होती. प्रवाशाने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली होती. त्यानंतर आता एअर इंडियाने या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

घडलेल्या घटनेनंतर एका आठवड्याने एअर इंडियाने माहिती दिली. एअर इंडियाच्या जेवणात ब्लेडसारखी वस्तू आढळल्याचे त्यांनी सांगितले. ही वस्तू भाजीपाला प्रक्रिया यंत्रणेतून आली आहे, असे एअर इंडियाचे अधिकारी राजेश डोगरा यांनी निवेदनात सांगितले आहे. एअर इंडियाने घडलेल्या घटनेबद्दल प्रवाशाची माफी मागली आहे. ही अशी घटना पुन्हा कधीच होणार नाही, याची काळजी घेणार असल्याचे सांगितले.

मॅथुरेस पॉल यांनी एक्स अकाउंटवर जेवणाचा फोटो पोस्ट करत ही माहिती दिली होती. त्यांनी जेवणासाठी उकडलेले रताळे आणि चाट मागवले होते. तेव्हा जेवण जेवताना तोंडात अचानक धातूचा तुकडा जाणवला. तेव्हा व्यवस्थित बघितल्यावर त्यात धातूचा तुकडा असल्याचे लक्षात आले. यामुळे एखाद्याला नुकसान होऊ शकते. याबाबत योग्य काळजी घेत नसेल तर चुकीचे आहे. हे खाद्यपदार्थ जर लहान मुलांना दिले असते तर काय झाले असते, असे त्यांनी पोस्ट करत सांगितले.

यानंतर एअर इंडियाने घडलेल्या घटनेची दखल घेऊन चौकशी केली. त्यांच्या केटरिंग पार्टनरच्या भाजीपाला प्रक्रिया मशिनमधून हा धातूचा तुकडा आला असल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खालावली

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

जरांगे-पाटील संधी साधूपणा करताय; भरत गोगावलेंचा टोला,शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांवरून राजकारण तापलं!

Khardi Kasara : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर! कसारा-खर्डी मार्गावर सुरू झाली तिसरी मार्गिका; प्रवास होणार सुपरफास्ट

Dombivli Water Cut : डोंबिवलीत सलग ३६ तास पाणी बंद; MIDC कार्यालयावर नागरिकांची धडक

SCROLL FOR NEXT