Tantalum : सतलज नदीत आढळलेला दुर्मिळ धातू टँटलम नक्की काय आहे?

What Is Tantalum : या धातूमधील वैशिष्ट्यांमुळे इतर कॅपेसिटरच्या तुलनेत यामुळे विजेची जास्त गळती होत नाही. वीज जास्त प्रमाणात साठवण्यासाठी टँटलम जास्त सक्षम आहे.
What Is Tantalum
What Is TantalumSaam TV

Tantalum Metal :

गेल्या वर्षी पंजाबच्या सतलज नदीमध्ये टँटलम नावाचा एक दुर्मिळ धातू सापडला होता. हा अनोखा धातू नेमका काय आहे? भारतात तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी त्याचा काय उपयोग आहे? यावर गेल्या वर्षभरापासून संशोधन सुरू आहे. अशात याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

What Is Tantalum
Vasai Crime News : तीन वर्षांपासून फरार खुनातील आरोपी अखेर ताब्यात; प्रेयसीच्या पतीची केली होती हत्या

सेमीकंडक्टर उद्योगात टँटलम धातूचा मोठा फायदा आहे. या धातूमध्ये वैशिष्ट्ये आहेत. या धातूमध्ये इतर कॅपेसीटकरच्या तुलनेत यामुळे विजेची जास्त गळती होत नाही. वीज जास्त प्रमाणात साठवण्यासाठी टँटलम जास्त सक्षम आहे. तसेच अन्य धातूंप्रमाणे यातून वीज गळती म्हणजेच लिकेज होत नाही.

आणखी सोप्या भाषेत जाणून घ्यायचे झाल्यास टँटलम हा एक धातू आहे. आपण वापरत असलेल्या विविध इलेक्ट्रीक वस्तूंमध्ये बॅटरी बसवली जाते. ही बॅट्री बनवताना विजेचा साठा करण्यासाठी त्यात काही धातू वापरले जातात. यातील काही धातूंमध्ये वीज जास्तप्रमाणात साठवता येत नाही.

अथवा त्या धातूमधून वीजेची गळती होते. त्यामुळे टँटलम हा असा धातू आहे जो लॅपटॉप, वाहने आणि अन्य मोठ- मोठ्या विजेवर चालणाऱ्या वस्तूंमध्ये वापरता येईल. टँटलममुळे त्या इलेक्ट्रीक वस्तूमध्ये सर्वाधिक वीज साठवण्याची क्षमता राहिल. यामुळे भविष्यात भारत तंत्रज्ञानात विशेष प्रगतीवर करू शकेल.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रोपर, पंजाबच्या टीमने गेल्या वर्षी सतलज नदीत शोधमोहिम सुरू केली होती. त्यामध्ये टँटलम या दुर्मिळ धातूचा शोध लागला आहे. गेल्या वर्षभरापासून या धातूचा नेमका उपयोग काय यावर संशोधन सुरु आहे.

What Is Tantalum
Satara Constituency: उदयनराजेंसाठी अजित पवार गट सातारा मतदारसंघ साेडण्यास तयार नाही, जाणून घ्या कारण (Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com