Ahmedabad plane crash video : Saam tv
देश विदेश

Ahmedabad plane crash : २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान हॉस्टेलवरच कोसळलं; १५ डॉक्टर जखमी, VIDEO

Air india plane crash video ahmedabad : २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवरच कोसळल्याची घटना घडली. या अपघातात १५ डॉक्टर जखमी झाले.

Vishal Gangurde

गुजरातच्या अहमदाबाद एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. विमान टेक ऑफ घेताच मेघानीनगर परिसरात विमान कोसळलं. विमानाच्या अपघातानंतर हवेत काळ्या धुराचे लोट पसरले. अहमदाबादहून लंडनला निघालेलं विमान मेघानीनगरमधील डॉक्टरांच्या हॉस्टेलवरच कोसळलं. या अपघातात १५ डॉक्टर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे.

अहमादाबादच्या मेघानीनगर पसिरात भीषण अपघात झालाय. लंडनला निघालेलं विमान मेघानीनगर परिसरात असलेल्या सिव्हिल रुग्णालयांच्या डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळलं. या अपघातात हॉस्टेलमधील १५ डॉक्टर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेविषयी वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, 'लंडनला निघालेलं विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळलं. विमान टेक ऑफ घेताच १० मिनिटांत विमान कोसळलं. त्यानंतर अवघ्या २-३ मिनिटांत पोलीस आणि इतर पथके घटनास्थळी पोहोचले. अपघातातस्थळचा ७० ते ८० टक्के परिसर स्वच्छ करण्यात आलाय. सर्व संस्था घटनास्थळी सहकार्य करत आहेत'.

मेघानीनगरच्या अहमदाबाद जिल्ह्यात येते. अहमदाबाद शहरापासून मेघानीनगर ५.६ किमी अंतरावर असल्याची माहिती मिळत आहे. मेघानीनगर अहमदाबादच्या पूर्व भागात आहे. मेघानीनगर परिसराजवळ अहमदाबाद छावणी, कलापी नगर, नरोडा रोडजवळ आहे. मेघानी नगरमध्ये सिव्हिल रुग्णालयासहित इतर खासगी रुग्णालय आहेत. मेघानीनगर भागात लोकवस्ती देखील आहे.

मेघानीनगरहून अहमदाबाद विमानतळाकडे जाण्यासाठी तीन मिनिटे लागतात. मेघानीनगर परिसरात जवळपास २५,८०१ इतकी नागरिक राहताता. त्यात १२२०७ महिला आणि १३५९४ पुरुषांचा समावेश आहे. मेघानीनगर परिसर हा जवळपास १.०७ किलोमीटर इतका आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय राहतात. आशा शाळा, डीएससी पब्लिक स्कूल, जयभरात शाळा या ४ किलोमीटर अंतरात आहे. सिव्हिल रुग्णालय, अक्षरकृपा रुग्णालय, शाहीबाग रुग्णालय आणि आनंद रुग्णालय ४ किलोमीटरच्या परिसरात आहे. तसेच रिलायन्स मॉल, अहमदाबाद सीटी मॉल आणि पॅवेलियन मॉल देखील याच भागात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni Net Worth: कॅप्टन कूल धोनीची एकूण संपत्ती नक्की किती? किंमत वाचून व्हाल थक्क

पुणे हादरलं! पोलीस कर्मचाऱ्यानं घरात गळफास घेत आयुष्य संपवलं; तपासात पोलिसांना सापडली महत्वाची गोष्ट | Pune Police

Sachin Sawant : मोठे साम्राज्य वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जातात; काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा कुणाल पाटील यांच्यावर निशाणा

Pune Fire : सिगारेट पेटवताच आगीचा भडका उडाला, चोराने सहा मोटारसायकल जाळल्या; पुण्यात भयंकर घडलं

Parenting Tips: मुलांना टिव्ही मोबाईलपासून दूर ठेवायचंय? मग करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT