Air India Flight Saam Digital
देश विदेश

Air India Flight : जायचं होतं अमेरिकेला..एअर इंडियाचं विमान पोहोचलं रशियात; २४५ प्रवासी अडकले

Air India Flight In Russia : एअर इंडियाचं २२५ प्रवाशांसह अमेरिकेला जाणारं विमान रशियात पोहोचलं आहे. प्रवाशांसह १९ क्रू मेंबर्स रशियात गुरुवारी रात्रीपासून अडकून पडले असून त्यांना बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत आहेत.

Sandeep Gawade

मायक्रोसॉफ्टमुळे आज जगभरातील यंत्रणा ठप्प झाली होती. त्याचा मोठा फटका विमानसेवेला बसला. जगभरातील विमानसेवा विस्कळीत झाली होती. या दरम्यान एअर इंडिया संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. एअर इंडियाचं २२५ प्रवाशांसह अमेरिकेला जाणारं विमान रशियात पोहोचलं आहे. प्रवाशांसह १९ क्रू मेंबर्स रशियात गुरुवारी रात्रीपासून अडकून पडले असून त्यांना तिथून बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक बिघाडामुळे गुरुवारी रात्री रशियातील क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केजेए) उतरलं होतं. कॉकपिट क्रूला कार्गो होल्डमध्ये बिघाडझाल्यानंतर फ्लाइट AI183 क्रॅस्नोयार्स्ककडे वळवण्यात आलं. विमानात 225 प्रवासी आणि 19 फ्लाइट क्रू मेंबर्स होते, अशी माहिती एअर इंडियाने ट्विचरवर दिली आहे.

आणखी एका ट्विटमध्ये एअर इंडियाने म्हटले आहे की, "एअर इंडियाकडे क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वतःचे कर्मचारी नाहीत, त्यामुळे प्रवाशांना आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी आम्ही थर्ड पार्टीची व्यवस्था करत आहोत. एअर इंडिया सरकारी संस्थांसोबत काम करत आहे. सर्व प्रवांशी आणि क्रू मेंबरबाबत चिंता आहे, त्यामुळे क्रास्नोयार्स्कवरून सॅन फ्रान्सिस्कोला जाणासाठी एका नव्या विमानाची व्यवस्था करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.

मात्र, विमान कंपन्यांच्या या दाव्याबाबत प्रवाशांमध्ये नाराजी आहे. केव्ही कृष्ण राव नावाच्या प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे, आम्ही विमानतळावर अडकून पडलो आहोत. आम्हाला कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. आमच्याकडे जेवणही नाही आणि आम्हाला कोणतेही अपडेट दिले जात नसल्याचं म्हटलं आहे.

वर्षभरात एअर इंडियाच्या विमानाचे रशियामध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणारं एअर इंडियाच्या विमानाला AI195 रशियातील मगदान विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावं लागलं होतं. या फ्लाइटमध्ये 16 क्रू मेंबर्ससह 216 प्रवासी होते. हे सर्वजण जवळपास ४० तास तिथे अडकले होते. त्यानंतर त्यांना फेरी फ्लाइटद्वारे सॅन फ्रान्सिस्कोला पाठवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, भिडे पूल पाण्याखाली

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT