Air India Plane Crash Saam
देश विदेश

Air India Plane Crash: विमानाचे इंधन स्विच कसं बंद झालं? तज्ज्ञाने व्यक्त केला संशय

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अपघातापूर्वी विमानाचे इंधन स्विच बंद झाले. त्यानंतर हा भयंकर अपघात झाला. पण हे इंधन स्विच कसे पडले याबाबत तज्ज्ञाने संशय व्यक्त केला.

Priya More

गुजरातच्या अहमदाबातमध्ये २ जून रोजी मोठा विमान अपघात झाला होता. या हा अपघात नेमका कसा झाला यामागाचे खरं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडा आहे. हा अपघात झाला तेव्हा सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता की इतक्या तपासण्या करूनही विमान अपघात कसा झाला. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांनी आपले मत मांडले खरं पण सर्वांच्या नजरा अधिकृत तपास अहवालावर होत्या. एका महिन्यानंतर जेव्हा विमान अपघाताच्या चौकशीचा अधिकृत अहवाल आला तेव्हा असे आढळून आले की विमानाचा इंधन स्विच अचानक खाली पडला त्यामुळे विमान कोसळले. अजूनही काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मिळालेली नाहीत. एका विमान ऑपरेशन्सचे ज्ञान असलेल्या तज्ज्ञांनी त्यांचे मत दिले आहे.

शुक्रवारी अहमदाबाद विमान अपघाताबाबत एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थातAAIB चा अहवाल आला तेव्हा त्यात इंधन स्विच खाली पडल्याचे उघड झाले. पण इंधन स्विच कसा पडला हे स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणावरील अहवालात एक रेकॉर्डिंग नमूद करण्यात आली आहे ज्यामध्ये एक पायलट दुसऱ्याला इंधन स्विच का खाली पडला असे विचारतो आणि उत्तर येते की मी इंधन स्विच खाली टाकला नाही. आता या विषयावर जोरदार चर्चा होऊ लागली आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की इंधन स्विच कसा खाली पडला?

इंधन स्विच खाली कसा पडला? यावर तज्ज्ञांनी त्यांचे मत दिले आहे. इंडियन पायलट फेडरेशनचे अध्यक्ष चरणवीर सिंग रंधावा यांनी सांगितले की, या अहवालातून कॉकपिटचे नियंत्रण कोणाकडे होते हे स्पष्ट झालेले नाही अशा परिस्थितीत हा अपघात वीजपुरवठा खंडित होण्याकडे किंवा सॉफ्टवेअरमध्ये काही प्रकारच्या बिघाडाकडे निर्देश करतो.

रंधावा यांनी पुढे सांगितले की, विमानाला को-पायटल चालवत होते. तर कॅप्टन विमानाचे कमांडिंग आणि देखरेख करत होते. त्यामुळे एवढा मोठा निर्णय कोणी घेतला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेकॉर्डिंग तपास यंत्रणेकडे आहे आणि कॉकपिट रेकॉर्डिंगवरून हे स्पष्ट होते की कोणाचा आवाज आदेश देत होता. व्हॉइस रेकॉर्डरमध्ये आवाज स्पष्ट आहे. दरम्यान, अहदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देशाला मोठा हादरला बसला होता. या विमान अपघातामध्ये २७५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भंडाऱ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत महसूल कर्मचाऱ्याचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार, टॅक्स वाढवावा लागेल, छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

Shivsena: ..तोपर्यंत 'धनुष्यबाण' गोठवा; शिंदेंविरोधात ठाकरेंची कोर्टात धाव; आज होणार सुनावणी

Gauri Nalawade: 'फूलाआड दडलेलं सौंदर्य....' गौरी नलावडेनं केलं फोटोशूट

Sawan Somvar Upay: श्रावणाच्या पहिल्या सोमवारी बनतोय दुर्लभ संयोग; 'या' उपायांनी दूर होईल आर्थिक तंगी

SCROLL FOR NEXT