Ahmedabad Plane Crash Saam Tv
देश विदेश

Ahmedabad Plane Crash : देव तारी त्याला कोण मारी! अहमदाबाद अपघातात मृत्यूच्या दारातून रमेश विश्वकुमार बचावला

Air Indian Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत 265 जणांना आपला जीव गमवावा लागला.. मात्र रमेश विश्वासकुमार मृत्यूच्या दाढेतून सुखरुप बाहेर पडलाय. विश्वाकुमार कसा वाचला? अपघातावेळी काय घडलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Yash Shirke

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

'देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण अहमदाबाद विमान अपघातानंतर खरी ठरलीय. या दुर्घटनेत 265 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. हृदयाचा थरकाप उडेल असं भीषण वातावरण घटनास्थळी होतं. अनेक प्रवासी जळालेले होते. मात्र अपघाताच्या काही वेळानंतर रस्त्यावरून रक्ताच्या थारोळ्यात चालत जाणारा एक व्यक्ती दिसला..हा व्यक्ती म्हणजे विमान अपघातातून बचावलेले रमेश विश्वासकुमार... दैव बलवत्तर असेल तर कसा चमत्कार घडू शकतो त्याचं मूर्तीमंत उदाहरण विश्वासकुमार यांच्या रुपानं पाहायला मिळालय. सीट नंबर 11 A वर बसलेले रमेश विश्वासकुमार मृत्यूच्या दाढेतून कसे सुखरुप बाहेर पडले.. अपघातावेळी नेमकं काय झालं? याची धक्कादायक माहिती रमेश विश्वासकुमार यांनी दिलीय.

अपघातानंतर विश्वासकुमार यांनी आपल्या डोळ्यादेखत दोन एअरहॉस्टेसना जळतानं पाहिलं..त्यामुळे इतका भीषण अपघात होऊनही रमेश विश्वासकुमार कसे वाचले, असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यात आता खुद्द विश्वासकुमार यांनीच आपबीती सांगितलीय. भारतीय वंशांचे ब्रिटश नागरिक असणारे रमेश विश्वासकुमार 11A नंबरच्या सीटमुळेच वाचले, असं बोललं जातयं. त्यामुळे 11A या सीटचं वैशिष्ट्य काय आहे? पाहूयात

11A सीटने वाचवला जीव

- अहमदाबाद विमान अपघातात फक्त 1 प्रवासी बचावला

- रमेश विश्वकुमार हा 11A सीट नंबरवर बसला होता

- 11A नंबरची सीट विमानाच्या एक्झिट दाराजवळ

- 11 A सीट ही विमानात इकोनॉमी क्लासमध्ये होती

- एअर इंडियाच्या विमानात पुढच्या भागात बिझनेस क्लास

- बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासमध्ये प्रत्येकी एक दरवाजा

- सीटशेजारी एक्झिट दाराजवळ असल्यानं विश्वासकुमार बाहेर पडला

दरम्यान जगाला हादरवणारा अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपास आता एटीएस करणार आहे. रमेश विश्वकुमार अपघातातून बचावल्यानं त्याच्याकडून मिळणारी माहिती तपासाला वेग देणारी ठरणार आहे. त्यामुळे हा अपघात नेमका कशामुळे झाला हे तपासानंतर लवकरच उघड होईल. मात्र या भीषण दुर्घटनेतही रमेश जिवंत राहण्याची चर्चा यापुढेही अनेक वर्षा होत राहणार शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT