Ahmedabad Plane Crash saam tv
देश विदेश

Ahmedabad Plane Crash:कोसळलेल्या विमानाचे पायलट होते कॅप्टन सुमीत सभरवाल; ८२०० तासांचा विमान उडवण्याचा होता अनुभव

Air india plane crash ahmedabad: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळल्याची दुर्घटना घडलीये. या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यावेळी विमानाची कमान कॅप्टन सुमित सभरवाल करत होते

Surabhi Jayashree Jagdish

अहमदाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. यावेळी अहमदाबादहून निघालेले विमान काही सेकंदाच कोसळल्याची माहिती आहे. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. यामध्ये दोन पायलट आणि १० केबिन क्रू यांचा समावेश होता. समोर आलेल्या माहितीनुसार, तब्बल ७०० फुटांवरून हे विमान कोसळण्याची माहिती आहे.

२४२ प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान कोसळलं आहे. या विमानाच्या पायलटचं नाव कॅप्टन सुमित सभरवाल होतं. या अपघाताबद्दल अधिक माहिती समोर येतेय. अद्याप या दुर्घटनेतील मृतांचा आकडा समोर आलेला नाही.

पायलटला किती अनुभव होता?

एएनआयने डीजीसीएच्या हवाल्यात असं म्हटलंय की, अपघातग्रस्त विमान कॅप्टन सुमित सभरवाल उडवत होते. त्यांना एलटीसीमध्ये ८२०० तासांचा अनुभव आहे. सह-वैमानिकाला ११०० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता.

विमानाने अहमदाबादहून रनवे 23 वरून 1339 IST (0809 UTC) उड्डाण केलं होतं. धावपट्टी 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळलं. यावेळी अपघात स्थळावरून प्रचंड काळा धूर निघताना दिसत होता.

अहमदाबादमधील विमान अपघाताची माहिती देताना डीजीसीएने म्हटलंय की, 'एअर इंडियाचे B787 विमान VT-ANB अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळलं. विमानात २४२ लोक होते, ज्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू होते. विमानाची कमान कॅप्टन सुमित सभरवाल करत होते आणि त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते.'

दुपारच्या वेळी घडला अपघात

आज दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळील मेघानी नगर परिसरात हे विमान कोसळल्याची माहिती आगे. अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.

हे विमान लंडनला जात होते. या अपघातात अनेक लोक जखमी होण्याची भीती आहे. अहमदाबादचे पोलिस आयुक्त जी.एस. मलिक म्हणाले, "विमानतळाजवळील मेघानी नगरमध्ये विमान कोसळलं आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT