Ahmedabad Fire  Saam tv
देश विदेश

Ahmedabad Fire : अहमदाबादमध्ये अग्नितांडव; भीषण आगीनंतर लोकांनी इमारतीमधून मारल्या उड्या, थरकाप उडवणारा VIDEO

Ahmedabad Fire News : अहमदाबादमध्ये अग्नितांडव पाहायला मिळत आहे. भीषण आगीनंतर लोकांनी इमारतीमधून उड्या मारल्या. या घटनास्थळाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे.

Vishal Gangurde

Ahmedabad Fire News : गुजरातच्या अहमदाबमध्ये एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली. इमारतीला आग लागल्यानंतर लोकांची एकच धावपळ उडाली. आग लागल्याने लोकांनी भीतीने इमारतीमधून उड्या मारल्या. तर काही लोकांनी खिडक्यांमधून लटकून जीव वाचवला. इमारतीला आग लागल्याची घटनेने इमारतीत खळबळ उडाली.

गुजरातच्या खोखर सर्कल येथील परिस्कर १ अपार्टमेंटमध्ये ही आगीची दुर्घटना घडली. इमारतीला आग आज शुक्रवारी दुपारी तीन वाजता लागली. इमारतीला आग लागल्यानंतर सर्वांची धावाधाव सुरु झाली. आतापर्यंत इमारतीमधील १८ जणांना रेस्क्यू करण्यात आलं. आगीवर नियत्रंण मिळवण्यात यश आलं आहे. त्यानंतर इमारतीत एकच खळबळ उडाली.

अहमदाबादच्या खोखरा येथील इमारतीत राहणाऱ्या भूमिका सांगितलं की, 'मी दुपारी ३.१५ वाजणाच्या सुमारास लोक ओरडू लागले. मी घराबाहेर आली, तेव्हा धूरांचे लोट दिसले. स्फोटांचा आवाज आला. यामुळे घराबाहेर निघालो. आमचा शू रॅक जळून खाक झाला. तसेत आमच्या घराचा मुख्य दरवाजाही जळून खाक झाला होता'.

भूमिका यांनी पुढे सांगितलं की, 'आग लागल्यानंतर इमारतीतून बाहेर पडलो. इमारतीमधून बाहेर आल्यानंतर आमच्या घरांचं किती नुकसान झालं, हे समजलं. आम्ही घरात असल्याने आगीचा किती भडका उडाला होता, हे कळाले नाही. इमारतीला आग भयंकर लागली होती'. दरम्यान, इमारतीमधून लोकांनी उड्या मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमधील दृश्य पाहून नेटकरीही हादरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT