Air India Plane Crash  x
देश विदेश

Ahmedabad Plane Crash : लग्नानंतर पहिल्यांदाच नवऱ्याला भेटायला निघाली खुशबू, वडील एअरपोर्टवर सोडायला आले अन्... विमान कोसळलं

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये राजस्थानच्या खुशबू राजपुरोहितचा देखील समावेश होता. ती नवऱ्याला भेटण्यासाठी अहमदाबादहून लंडनला निघाली होती. त्यादरम्यान ही दुर्घटना घडली.

Yash Shirke

Plane Crash Incident : गुजरातमधील अहमदाबाद येथे विमान दुर्घटना झाली. एअर इंडियाचे प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळले. हे विमान मेघानीनगरच्या एका हॉस्टेलवर कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. विमानात एकूण २४२ जण असल्याचे म्हटले जात आहे. अपघातादरम्यान विमानात राजस्थानची खुशबू राजपुरोहित देखील होती. लग्नानंतर खुशबू पहिल्यांदाच लंडनला जात होती.

खुशबूचा पती मनफूल सिंग हा लंडनमधील एका आयटी कंपनीमध्ये कार्यरत आहे. त्याला भेटायला जाण्यासाठी खुशबू भारतातून निघाली होती. तिचे वडील आणि काका अहमदाबाद विमानतळावर निरोप देण्यासाठी खुशबूसह आले होते. खुशबू विमानतळाच्या आत निघून गेल्यानंतर काही वेळातच अपघाताची बातमी समोर आली. ही माहिती मिळताच खुशबूच्या कुटुंबात गोंधळ उडाला. कुटुंबातील सर्व सदस्य सध्या खुशबूबद्दलची माहिती गोळा करत आहेत. खुशबू सुरक्षित असावी अशी आशा सर्वजण करत आहेत.

लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या कॅबिन क्रूमध्ये बदलापूरच्या दीपक पाठक यांचा समावेश आहे. सकाळी विमान टेकऑफ करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर अपडेट शेअर केली होती. आमचा देवावर पूर्ण विश्वास असून आम्ही दीपक यांच्या बाबतीत आशावादी आहोत असे दीपक पाठक यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील अपर्णा महाडीक, मैथिली पाटील या देखील अपघातग्रस्त विमानात होत्या.

Air India च्या AI 171 या विमानाला अहमदाबादमध्ये भीषण अपघात झाला. या विमानात एकूण १६९ भारतीय, ५३ ब्रिटीश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन प्रवासी प्रवास करत होते. याशिवाय, १० केबिन क्रू सदस्य आणि २ वैमानिक विमानात उपस्थित होते. विशेष म्हणजे, या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

SCROLL FOR NEXT