Soami Bagh Mausoleum Google
देश विदेश

Soami Bagh Mausoleum : सेम टू सेम ताजमहालच! बांधकामाला १०० हून अधिक वर्षांचा काळ; पर्यटकांचं ठरतंय आकर्षण

Soami Bagh Mausoleum News: जगभरात ७ आश्चर्य आहेत. यामध्ये भारतातील ताज महालदेखील आहे. आग्रा येथील ताज महाल पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येतात. आता अजून एक ताजमहाल भारतात तयार होत असल्याचे बोलले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगभरात ७ आश्चर्य आहेत. यामध्ये भारतातील ताज महालदेखील आहे. आग्रा येथील ताज महाल पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येतात. पांढऱ्या शुभ्र मार्ब्ल्सने बनवलेला हा ताज महाल पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. शहाजहाने पत्नीच्या प्रेमासाठी ताज महाल बांधला. याच ताजमहालसारखा आता आणखी एक समाधी आग्रा येथे तयार करण्यात येत आहे. राधास्वामी पंथाच्या संस्थापकांची ही समाधी आहे. पांढऱ्या संगमरवरी दगडात ही समाधी बांधण्याचे काम सुरु आहे. जवळपास १०० हून अधिक वर्ष ही समाधी बांधण्यासाठी लागली आहेत.

पांढऱ्या संगमरवरी दगडात बांधलेली ही समाधी पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. ही समाधी ताज महालच्या देखाव्याला स्पर्धा देईल, असे म्हटले जात आहे. १७ व्या शतकात शहाजहानने पत्नीसाठी ताज महाल बांधला. कुशल कारागीर आणि त्यांच्या मेहनतीने ताजमहाल बांधण्यात आला आहे. हा ताजमहाल बांधण्यासाठी जवळपास २२ वर्ष लागली. परंतु स्वामी बाग समाधीचे बांधकाम १०० वर्षांहून अधिक काळ सुरु आहे.

५२ विहिरींच्या पायावर वसलेली १९३ फूट उंच रचना उभारण्यात आली आहे. यासाठी राजस्थानमधील पांढरे संगमरवरी दगड वापरण्यात आले आहे. हा भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी उपक्रम असल्याचे सांगण्यात येत आहे. ही समाधी ताज महालपासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. आग्राच्या दयालबाग परिसरातील स्वामी बाग कॉलनीमध्ये ही समाधी आहे. रोज मोठ्या संख्येने पर्यटक या समाधीला भेट देतात. या समाधीला भेट देण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

मूळ समाधी ही पांढऱ्या सँडस्टोनची रचना होती. अलहाबाद येथील एका वास्तुविशारदाने नवीन डिझाइनचे बांधकाम १९०४ मध्ये सुरु केले. त्यानंतर आता या समाधीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालन्यात बंजारा समाजाचा प्रचंड मोर्चा

Sangli Fake IT Raid: सांगलीत स्पेशल 26 स्टाईल लूट! बनावट आयकर अधिकाऱ्यांची डॉक्टरच्या घरावर धाड; कोट्यावधी रुपये लंपास|VIDEO

Hingoli : हिंगोलीत पावसाचा कहर! चार दिवसांपासून १० गावांचा संपर्क तुटला | VIDEO

तुमच्या दररोजच्या 'या' सवयी किडनी करतायत फेल; आजच बदला

Jalgaon Crime : दोन कुटुंबात जुना वाद उफाळला; हाणामारीत एकाच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT