Agra wife buries husband under bathroom floor 
देश विदेश

पत्नीचा अंगावर काटा आणणारा कट, पतीला मारले अन् मृतदेह बाथरूमखाली गाढला; पोलिसांच्या एका शंकेनं क्रूर कृत्य आले समोर

Agra murder case : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये ४५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पतीचा मृतदेह घरातील बाथरूमच्या फरशीखाली आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले असून चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत.

Namdeo Kumbhar

Agra wife buries husband under bathroom floor : चित्रपट किंवा वेब सीरिजलाही लाजवेल अशी एक अत्यंत थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथून समोर आली आहे. गेल्या ४५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह थेट त्याच्याच घराच्या बाथरूममधील फरशीखाली गाडलेल्या अवस्थेत आढळला आहे. पतीची हत्या करून त्याच्याच मृतदेहावर ४५ दिवस संसार करणाऱ्या क्रूर पत्नीचा कट पोलिसांनी अखेर उधळून लावला आहे. घरामध्ये अचानक लावण्यात आलेल्या एका नवीन फरशीच्या तुकड्याने पोलिसांचा संशय बळावला आणि थरकाप उडवणाऱ्या या 'बाथरूम मर्डर'चा पर्दाफाश झाला.

देशात आधीच सोनम रघुवंशी आणि सिया गोयल यांनी केलेल्या हत्याकांडामुळे देशात खळबळ उडालेली असताना, आता आग्रामध्ये पतीचा खून करून त्मृतदेह बाथरूममध्ये गाढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपी पत्नीचे नाव रूबी सुरेंद्र शर्मा असे आहे. तर मृत पतीचे नाव सुरेंद्र कुमार शर्मा असे आहे.

सुरेंद्र वारंवार दारू प्यायचा आणि पत्नीला मारहाण करायचा. त्यामुळेच दारुड्या नवऱ्याच्या वागणुकीला कंटाळून रूबीने दीड महिन्यापूर्वी त्याची हत्या केली. त्यानंतर तिने मृतदेह बाथरूममध्ये पुरला आणि त्यावर सिमेंटची फरशी टाकली. पती हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर तिने पोलिसांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि नवऱ्याच्या आठवणीने परिसरात रडलीसुद्धा. शुक्रवारी, त्या महिलेने आपल्या दीराला या घटनेबद्दल माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी बाथरूमची फरशी खोदली असता त्यांना एक सांगाडा सापडला.

रूबीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी पत्नीने चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेपूर्वी बाथरूमचे काम पूर्ण करण्यासाठी मेकॅनिक आणि मजूर बोलावण्याची तयारी करण्यात आली होती. पण, या हत्येमागील खरा हेतू तपास आणि इतर पुराव्यांनंतरच निश्चित होईल. पोलिसांनी मृत सुरेंद्र यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात शनिवारवाड्यासमोर CJP चं आंदोलन

Beauty Tips : महागड्या क्रीम्सवर हजारो रुपये खर्च कशाला? डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी करा 'हे' ५ सोपे घरगुती उपाय!

Student Protest : शिवाजी पार्क आंदोलनावरून विद्यार्थ्यांची पोलिसांनाच कायदेशीर नोटीस

हातात तिरंगा, ओठांवर देशभक्तीची गाणी! भर पावसात मुंबईच्या शिवाजी पार्कवर तरुणाईचा महाआक्रोश|VIDEO

बिपी अचानक लो होण्यामागची कारणे काय?

SCROLL FOR NEXT