Shubhangi Patil, Eknath Shinde, Maharashtra politics : राज्यात 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धुळे जिल्ह्यात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला असून, पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी अखेर शिंदे सेनेत जाहीर प्रवेश केला आहे. ठाण्यात रात्री एक वाजता पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात हा पक्षप्रवेश झाला. धुळे आणि उत्तर महाराष्ट्रात शुभांगी पाटील यांचा मोठा जनसंपर्क असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशामुळे या भागात शिंदे सेनेची ताकद कमालीची वाढणार आहे.
शिंदे सेनेचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शुभांगी पाटील यांनी हातात शिवसेनेचा भगवा झेंडा घेतला. केवळ शुभांगी पाटीलच नव्हे तर धुळ्यातील त्यांच्यासोबतच्या हजारो ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे सेनेचे ६ खासदार फोडल्यानंतर 'ऑपरेशन टायगर' पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे बोलले जात असून धुळ्यातील हा पक्षप्रवेश ठाकरे सेनेसाठी मोठा फटका मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच ठाकरे सेनेचे ६ खासदार फुटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांना शिंदे सेनेत आणण्याची मोहीम सक्रिय झाली आहे. शुभांगी पाटील यांचा प्रवेश हा याच मोहिमेचा एक मोठा भाग असल्याचे बोलले जात असून, यामुळे ठाकरे सेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
हजारो कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन
शुभांगी पाटील यांनी केवळ एकट्याने प्रवेश न करता धुळ्यातील आपल्या हजारो समर्थकांना आणि ठाकरे सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिंदे सेनेत प्रवेश केला. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील ठाकरे सेनेची स्थानिक संघटना पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा मोठा फेरबदल धुळ्याच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.