Amit Shah
Amit Shah SaamTV
देश विदेश

देशभरातून अग्निपथ योजनेला विरोध; केंद्राची अग्निवीरांसाठी मोठी घोषणा

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (Cetral Government) लष्कर भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) देशभरातून विरोध होत आहे. ही योजना फसवी असल्याचं अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. योजनेच्या निषेधार्थ देशभरातील अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. बिहारमध्ये तर आंदोलक विद्यार्थ्यांकडून रेल्वेच्या डब्यांना आग लावण्याच्या घटना समोर आल्या आहे. अशातच केंद्र अग्निवीरांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. (Agneepath Scheme Latest Marathi News)

देशभरातून अग्निपथ योजनेला विरोध होत असताना केंद्राने आता आणखी एक मोठी घोषणा केली. आता CAPF आणि आसाम रायफल्समध्ये अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतची माहिती ट्विट करत दिली आहे. मंत्रालयाने ट्विट केले की, 'गृह मंत्रालयाने अग्निपथ योजनेंतर्गत CAPF आणि आसाम रायफल्समध्ये भरतीमध्ये 4 वर्षे पूर्ण केलेल्या अग्निवीरांसाठी 10% रिक्त जागा राखून ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, यासोबतच तरुणांना वयोमर्यादेतही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला'

याव्यतिरिक्त CAPF आणि आसाम रायफल्सने अग्निवीरांना भरतीसाठी निर्धारित केलेल्या कमाल प्रवेश वयोमर्यादेत 3 वर्षांची आणि अग्निपथ योजनेच्या पहिल्या बॅचसाठी 5 वर्षे सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या अग्निवीर सैनिकांना प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा गृह मंत्रालयाने बुधवारी केली होती.

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर देशातील अनेक राज्यांमध्ये तरुणांनी गदारोळ सुरू केला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी तोडफोड केली. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी रेल्वे डब्यांना सुद्धा आग लावण्याच्या घटना घडल्या. अजूनही या योजनेविरोधात उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये प्रचंड गोंधळ सुरू आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT