पंतप्रधान मोदींनी धुतले आईचे पाय; वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट दिलं? वाचा...

मोदी यांच्या मातोश्री हिराबेन आज 100 व्या वर्षात पदार्पण करत आहे
PM Modi Mother Hiraben Birthday Celebrate
PM Modi Mother Hiraben Birthday Celebrate Tweeter/@narendramodi

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचा आज वाढदिवस आहे. हिराबेन आज आपल्या आयुष्याच्या 100 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्तानं पंतप्रधान मोदी हे सुद्धा आई हिराबेन यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गुजरातमध्ये (Gujarat) पोहचले. गुजरातमधील गांधीनगर येथे भावाच्या घरी जात मोदींनी हिराबेन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या इतकंच नाही, तर मोदींनी हिराबेन यांचे पाय धुतले आणि त्यांनी एक खास गिफ्टही दिलं. (PM Narendra Modi Mother Birthday Latest News)

PM Modi Mother Hiraben Birthday Celebrate
'बा'ची शतकपूर्ती; पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला

विशेष बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी 11 मार्च रोजी गुजरात दौऱ्यावर आले होते. यावेळी सुद्धा त्यांनी आईची भेट घेतली होती. आईच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पुजा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी 100व्या वाढदिवसानिमित्त आई हिराबेन यांचे पाय धुतले आणि त्यांनी पुष्पहार घालून त्यांच्या चरणांना स्पर्श करत आईचा आशिर्वाद घेतला. इतकंच नाही तर, मोदींनी यावेळी आईला एक शालही गिफ्ट दिली. "वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण करत असल्याने आज आईची भेट घेत तिचे आशिर्वाद घेतले", असं मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

मोदींच्या हस्ते 16 हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन

पीएम मोदी आज गुजरात गौरव अभियानादरम्यान 16,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यावेळी फ्रेट कॉरिडॉरचा 357 किमी लांबीचा न्यू पालनपूर-मदार विभागाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

याशिवाय, 81 किमी लांबीच्या पालनपूर-मिठा विभागाचे विद्युतीकरण, सोमनाथ, सुरत, उधना आणि साबरमती स्थानकांच्या पुनर्विकासाची आणि 166 किमी अहमदाबाद-बोताड विभागाच्या गेज हस्तांतरणाची पायाभरणी देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com