Earthquake Earthquake In Nepal and Delhi-NCR Area  Saam Digital
देश विदेश

Earthquake India Nepal: नेपाळनंतर भारतात मोठा भूकंप येण्याची शक्यता, कोणत्या राज्याला असेल सर्वाधिक धोका

Earthquake India Nepal: भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाने हाहाकार माजवला आहे. या भूकंपाचे दिल्लीपर्यंत हादरे बसले होते. दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेश, बिहारमध्येही झटके बसले होते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Earthquake India Nepal

भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाने हाहाकार माजवला आहे. या भूकंपाचे दिल्लीपर्यंत हादरे बसले होते. दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेश, बिहारमध्येही झटके बसले होते. लोक भीतीने घरातून बाहेर पडले होते. दरम्यान कानपूर आयआयटीच्या संशोधकांनी भारतात मोठ्या भूकंपाची शक्यता व्यक्त केली आहे.

सतत एकाच ठिकाणी भूकंप होणे हा चिंतेचा विषय असल्याचे कानपूर आयआयटीचे प्रोफेसर जावेद मलिक यांनी म्हटले आहे. कमी तिव्रतेचे जास्त भूकंप येणे म्हणजे एका मोठ्या संकटाची चाहूल आहे. मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. नेपाळसारखाच उत्तराखंड झोन सुद्धा सक्रीय आहे. त्यामुळे या भागात मोठ्या भूकंपाची शक्यता नाकारता येत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेपाळमध्ये येत असलेले भूकंप पश्चिमेकडे सरकत आहेत. त्यामुळे याचा परिणाम उत्तराखंडमध्येही पहायला मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात उत्तराखंडमध्येही एक मोठा भूकंप येणार आहे. मान्सूनच्या काळात जमिनीच्या भेगांमध्ये ज्यावेळी पाणी भरतं त्यावेळी पाण्याचा दाब निर्माण होतो आणि या पाण्याच्या दाबामुळे भूकंपाचा धोका वाढत जोतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.

आआयटी कानपूरच्या एका प्रोजेक्टदरम्यान, जिथे भूकंप येण्याची शक्यता आहे अशा फॉल्ट लाइंन्स अधोरेखित करण्यात आल्या आहेत. किती तिव्रतेचा भूकंप येऊ शकतो हे या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. तसेच भविष्यात कोणत्या प्लेट्स सरकू शकतात हे ही अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी बांधकाम आणि मोठ्या प्रकल्पांवर बंदी घालून भूकंपाची शक्यता कमी करता येईल आणि होणारे नुकसान टाळता येऊ शकतं, हे या संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

नेपाळमध्ये शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या ६.४ तिव्रतेच्या भूकंपाने प्रचंड विध्वंस झाला आहे. ज्यात अनेक इमारती, घरे जमीनदोस्त झाली. आतापर्यंत १२९ जणांचा या भूकंपात मृ्त्यू झाला आहे. पश्चिम रुकूम आणि जाजरकोट मध्ये मृतांची संख्या अधिक आहे. नेपाळमध्ये आलेला भूकंपाचा परिणाम दिल्ला एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात पहायला मिळाला. बिहारच्या पटनापासून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपर्यंत भूकंपाचे हादरे बसले होते. यावरून या भूकंपाच्या तिव्रतेचा अंदाज येऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Maharashtra News Live Updates: महायुतीची आज कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

SCROLL FOR NEXT