आता अफगाणिस्तानात तालिबान्यांचा क्रूर असा 'शरिया कायदा' Saam Tv
देश विदेश

आता अफगाणिस्तानात तालिबान्यांचा क्रूर असा 'शरिया कायदा'

अफगाणिस्तानमध्ये भीतीच्या वातावरणात राहणाऱ्या लोकांसाठी तालिबानने हे स्पष्ट केले आहे की, ते शरिया कायद्यानुसारच तालिबानी देशावर राज्य करतील.

वृत्तसंस्था

Afghanistan Sharia law: अफगाणिस्तानमध्ये भीतीच्या वातावरणात राहणाऱ्या लोकांसाठी तालिबानने हे स्पष्ट केले आहे की, ते शरिया कायद्यानुसारच तालिबानी देशावर राज्य करतील. तालिबान्यांनी राजधानी काबूल ताब्यात घेतल्यानंतर पहिल्या प्रेस ब्रीफिंगमध्ये तालिबानच्या जबीबुल्लाह मुजाहीद या प्रवक्त्याने सांगितले की, मीडिया आणि महिला हक्कांसारख्या मुद्द्यांचा "इस्लामिक कायद्याच्या चौकटीत" आदर केला जाईल. महिलांचा सक्रिय सहभाग आमच्या समाज वर्तुळात आम्हाला हवा आहेच, आमच्या कायद्याच्या चौकटीत राहून महिलांनी नोकरी किंवा शिक्षण घेतलं तर आमची काहीच मनाई नाही. अफगाणिस्तान इस्लाम धर्माच्या चौकटीतच चालेल.

हे देखील पहा-

शरिया कायदा Sharia Law ही इस्लामची कायदेशीर व्यवस्था प्रणाली आहे. शरिया म्हणजे योग्य मार्ग. शरिया या शब्दाचा अर्थ 'स्वच्छ, आखून दिलेला रस्ता' असा आहे. मानलं जात की, ही प्रणाली कुराण आणि फतव्यांच्या आधारे बनवली गेली आहे. शरिया कायदा हा चौदाशे वर्षांपूर्वी लिहिला गेला असून सर्व मुस्लिमांना शरिया कायदा अंतर्गत नियम पालन करण्यास सांगितले जाते. ज्यामध्ये प्रार्थना, उपवास आणि गरिबांना दान करणे या बाबींचा समावेश आहे. यात मुस्लिमांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलू अल्लाहच्या इच्छेनुसार कसे जगावे हे स्पष्ट करणे हा आहे.

मुस्लिमांच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक पैलू कसा जगावा हे शरिया कायदा दाखवते. म्हणजे त्या व्यक्तीने कधी काय करावे आणि काय करू नये. जेव्हा एखादी समस्या उद्भवते, तेव्हा तो आपल्या धर्माच्या कायदेशीर चौकटीत काय करू शकतो या कायद्याचा पगडा इतका आहे की, एखाद्या व्यक्तीला त्याच्या मित्राने ऑफिस नंतर बाहेर बोलावले तर याबाबत त्यासाठी तो धर्मगुरुंकडे सल्ला मागितला जातो. शरिया विद्वानांकडे सल्ला मागू शकतो. याशिवायही दैनंदिन जीवनातील इतर गोष्टींमध्ये जर मुस्लिमांना कोणत्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, तेही ते शरिया कायद्यातून घेऊ शकतात. यामध्ये कौटुंबिक कायदा, वित्त आणि व्यवसाय यांचा समावेश आहे.

पण सर्वच मुस्लीम व्यक्ती हे या शरियाचे काटेकोर पालन करतात असेही नाही. काहींना तो काळाशी साधर्म्य साधणारा वाटत नाही. कारण शरियाचे कायदे हे फार पुरातन आहेत. गेली अनेक वर्षे यात बदल झालेले नाहीत. 20 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबानची जी पहिली राजवट होती, त्यात मूलभूत शरिया कायदा पाळण्याची सक्ती अफगाणच्या जनतेवर केली जात होती.

शरिया या कायद्यातील कठोर शिक्षा

शरिया कायद्यांतर्गत गुन्हे दोन सामान्य श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. पहिला “हद” गुन्हा, ज्यात गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत आणि ज्यासाठी कठोर शिक्षा निश्चित केली गेली आहे. दुसरा “तज़ीर” गुन्हा ज्यात शिक्षा धर्मगुरू न्यायाधीशांवर सोडली जाते. हदमध्ये चोरीचा समावेश असला तर, गुन्हेगाराचे हात देखील कापले जातात.

काही कट्टरतावादी इस्लामिक संघटनांनी असा युक्तिवाद केला आहे की, टोकाची शिक्षा टाळण्यासाठी अनेक सुरक्षा उपाय आहेत, तसेच गुन्हा सिद्ध करण्यासाठी ठोस पुराव्यांची आवश्यकता आहे.

फाशीच्या शिक्षेसाठी संयुक्त राष्ट्राने UN बंदी घातली आहे. UN च्या मते ती "छळ, क्रूरता, अमानुष आणि अपमानजनक शिक्षा आहे आणि ही शिक्षा अन्यायकारक आहे." तथापि, सर्व मुस्लिम देश अशा शिक्षेचा अवलंब करत नाहीत. असे संयुक्त राष्ट्राने स्पष्ट सांगितलं आहे. यावर अनेकांचे मत भिन्न आहे.

धर्मत्याग, किंवा धर्म बदलाच्या मुद्यावर, बहुतेक विद्वान मृत्युदंडाची शिक्षा दिली पाहिजे. यावर सहमत आहेत. परंतु मुस्लिम विचारवंतांमध्ये जे विशेषतः पाश्चात्य समाजांशी संबंधित आहेत, ते असा युक्तिवाद करतात की आधुनिक जगात त्याला "शिक्षा" देण्याचे काम अल्लाहवर सोडले पाहिजे.

शरिया कायद्याच्या पाच वेगवेगळ्या शाळा आहेत. चार सुन्नी शिकवण आहेत: हनबली, मलिकी, शफ़ी और हनफ़ी आणि शिया सिद्धांत, शिया जाफ़री आहे.

शरिया कुठे अस्तित्वात आहे?

शरिया बहुतेक मुस्लीम देशांमध्ये सद्य अस्तित्वात आहे. पण त्याची अंमलबजावणी संपूर्णपणे त्या त्या देशातल्या मुस्लीम धर्मगुरू आणि तेथील अभ्यासकांवर अवलंबून आहे. जसे की, दुबई शहरमध्येही बरेचसे मुस्लिम आहेत, मुस्लीम राष्ट्राचा भाग आहे. पण, त्या ठिकणी कायदे काही प्रमाणात सौम्य आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Ticket Price: पूरग्रस्त महाराष्ट्राला दिलासा! १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द, सरकारचा मोठा निर्णय

Pune Andekar Gang : आंदेकर टोळीचे पाय आणखी खोलात; व्यावसायिकाकडून उकळली ५.४ कोटींची खंडणी

CNG Project : साखर कारखान्यातून CNG निर्मिती; कोपरगावमधील साखर कारखाना ठरला देशातील पहिला

Cheque Bounce: चेक बाउन्स झाल्यास कुठे तक्रार करू शकतो; सुनावणीसाठी किती दिवस लागतात?

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ४ ऑक्टोबरला मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक

SCROLL FOR NEXT