वृत्तसंस्था : तालिबाननं Taliban अफगाणिस्तानवर Afghanistan कब्जा केल्यावर आता परत त्यांच्या शेजारी किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या देशांसोबत संबंध बदलू लागले आहेत. भारत India आणि अफगाणिस्तान हे खूप जवळचे चांगले मित्र आहेत, पण तालिबान सत्तेवर येताच त्यांनी भारतासोबत आयात Import आणि निर्यात Export या दोन्ही बंद केले आहे. तालिबाननं भारतासोबत सर्व प्रकारची आयात आणि निर्यात बंद केली आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट Federation of Indian Exports ऑर्गनायजेशनचे महासंचालक डॉक्टर अजय सहाई यांनी यासंदर्भातील महत्वाची माहिती दिली आहे. तालिबानने पाकिस्तानच्या Pakistan हवाई मार्गाने होणारी, कार्गो वाहतूक आता थांबवली आहे. देशामधून होणारी आयातही रोखण्यात आली आहे. अफगाणिस्तान मधील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्यामुळे भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत.
हे देखील पहा-
सुकामेव्याच्या मिठायांच्या किंमती देखील आता वाढल्याचे असल्याचे चित्र आहे. वृत्तसंस्था ANI ला डॉ. अजय सहाई यांनी सांगितले आहे की, तालिबानने यावेळी सर्व मालवाहतूक बंद केली आहे. आपला माल अनेक वेळेस पाकिस्तानातून पुरवला जात होता. जो आता बंद करण्यात आला आहे. आम्ही अफगाणिस्तान मधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, जेणेकरून आम्ही पुरवठा सुरू करू शकतो.
पण सध्या तालिबानने निर्यात- आयात बंद केली आहे. डॉ. अजय सहाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायाच्या बाबतीमध्ये भारत हा अफगाणिस्तानचा सर्वात मोठा भागीदार आहे. २०२१ मध्ये आपल्या देशामधील निर्यात ८३५ मिलियन डॉलर होती. तर आता ती ५१० मिलियन डॉलरची आयात आहे. आयात- निर्याती व्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
ज्यामध्ये साधारण ४०० योजनांमध्ये ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. भारत सारखे, चहा, कॉफी मसाला सहित अन्य वस्तूंची निर्यात करत असतो. तर ड्राय फ्रूट्स, कांदे इत्यादी मोठ्या प्रमाणावर आयात केले जाते. अशा स्थितीमध्ये येणाऱ्या काळात सुक्या मेव्याचे भाव वाढू शकतात. दरम्यान, अफगाणिस्तान मध्ये तालिबानची सत्ता येताच त्यावर निर्बंध सुरू करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सांगितले आहे की, अफगाणिस्तान यापुढे आयएमएफ संसाधनांचा वापर करू शकणार नाही. त्याला कोणतीही नवीन मदत यापुढे मिळणार नाही.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.