Mumbai Local: मध्य रेल्वेला पावसाचा फटका, लोकलसेवा उशिराने; घराकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल

Mumbai Rain: मुंबईमध्ये गेल्या काही तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. लोकलसेवा उशिराने सुरू असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
Mumbai Local: मध्य रेल्वेला पावसाचा फटका, लोकलसेवा उशिराने; घराकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल
Mumbai LocalSaam Tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. मध्य रेल्वेवरील लोकलसेवा उशिराने सुरू आहे. त्यामुळे कामावरून घराच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहे. लोकल उशिराने धावत असल्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. कल्याणहून कर्जत, कसारा, बदलापूर आणि अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. इंडिकेटर आणि ट्रेनच्या सूचना न मिळाल्याने प्रवासी गोंधळून ब्रिजवरच थांबलेले दिसत आहेत. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली असून कल्याणवरून कर्जत, कसारा, टिटवाळा, अंबरनाथ, आसनगाव आणि बदलापूरकडे जाणाऱ्या लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत.

Mumbai Local: मध्य रेल्वेला पावसाचा फटका, लोकलसेवा उशिराने; घराकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल
Mumbai Local : बदलापुरातून पनवेलला ३० मिनिटात लोकलने जा, रेल्वेचा जबरदस्त प्लॅन, वाचा सविस्तर

तर कल्याण रेल्वे स्थानकावर इंडिकेटर व्यवस्थित सुरू नसल्याने प्रवाशांना वेळेवर सूचना मिळत नाहीत. त्यामुळे ब्रिजवर उभे राहून प्रवासी लोकलची वाट पाहत आहेत. अचानक एखाद्या प्लॅटफॉर्मवर लोकल आल्यास प्रवाशांची एकच धावपळ उडत असून अपघाताचा धोका वाढत आहे.

Mumbai Local: मध्य रेल्वेला पावसाचा फटका, लोकलसेवा उशिराने; घराकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल
Local Train Video: लोकल ट्रेनमध्ये तरूणीने गायला शिवरायांचा पोवाडा; नेटकरी म्हणाले, 'संस्कार...'

नियोजित वेळेवर लोकलची माहिती न मिळाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. तर दुसरीकडे कल्याण रेल्वे स्थानकावर आणि ब्रिजवर लांबपल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांची देखील मोठी गर्दी झाली आहे. लोकलसोबत लांबपल्ल्याच्या गाड्या देखील उशिराने धावत आहे. पावसामुळे संपूर्ण रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे.

Mumbai Local: मध्य रेल्वेला पावसाचा फटका, लोकलसेवा उशिराने; घराकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, एक्सप्रेस गाड्यांचा खोळंबा, लोकलवरही परिणाम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com