Afghanistan Pakistan Border Clashes 
देश विदेश

Pakistan : एअरस्ट्राइकला तालिबानचं प्रत्युत्तर! पाकिस्तानच्या ५ प्रांतावर हल्ला, १२ सौनिकांचा मृत्यू, अनेक चौक्यांवर कब्जा

Taliban Pakistan Attack : पाकिस्तानच्या एअरस्ट्राइकनंतर अफगाणिस्तानकडून मोठं प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. तालिबानी सैन्याने पाकिस्तानच्या पाच प्रांतांवर हल्ला चढवून १२ सैनिकांचा बळी घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये भीषण संघर्ष सुरू असून दक्षिण आशियात तणाव वाढलाय.

Namdeo Kumbhar

Afghanistan Pakistan Border Clashes : पाकिस्तानने अफगाणिस्तानातील हवाई हल्ल्यांनंतर, आता तालिबानने 'चोख प्रत्युत्तर' देत सीमेवर भीषण संघर्ष सुरू केलाय. नंगरहार आणि कुनार प्रांतात अफगाणी सैनिकांनी पाकिस्तानी सैन्य चौक्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात १२ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून त्यांचं मोठं नुकसान झालंय.. अफगाण सैन्याने 'ड्युरंड लाईन' जवळील अनेक पाकिस्तानी चौक्यांवर ताबा मिळवला आणि त्यांच्या लष्करी सुविधा उद्ध्वस्त केल्या.

तालिबानने पाकिस्तानवर आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा आणि हवाई हल्ले केल्याचा आरोप केलाय. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांनी भारतामधून पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला की, "अफगाणींच्या धैर्याची परीक्षा घेऊ नका." या गंभीर संघर्षाने दोन्ही देशांमधील तणाव युद्धाच्या टोकावर आणला असून, दक्षिण आशियात मोठा अस्थिरता निर्माण झालीय.

शनिवारी रात्री तालिबानी सैन्याने एकाचवेळी पाकिस्तानच्या पाच प्रांतावरहल्ला केला. अफगानिस्तानी मिडिया आणि तालिबानमधील सूत्रांनी या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सिमेवर सध्या तणावपूर्ण शांतता असून संघर्ष अद्याप सुरूच असल्याचे समोर आले आहे. दोन्ही देशांमध्ये भीषण संघर्ष सुरू असल्याचे अमेरिकेच्या जल्मय खलीलजाद यांनी सागंतिलेय.

टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, तालिबानी सैनिकांनी पाकिस्तान सैन्याच्या आठ ठिकाणी एकाचवेळी हल्ला केला. पाकिस्तानच्या सिमेवरील अचीन, स्पिन घार, ललपूरा, शोराबाक आणि जाबूल प्रांताच्या काही ठिकाणी पाकिस्तानच्या चौक्या तालिबान्यांनी उद्ध्वस्त केल्या. तालिबानी सैन्याच्या हल्ल्यात पाकिस्तानचे १२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर काहीजण बंदी आहे. दरम्यान, पाकिस्तानने काबुल अन् पक्तियामध्ये हवाई हल्ला करत सर्वसामान्यांना निशाणा बनवलं होतं. पाकिस्तानच्या या हल्ल्याचे हे प्रत्युत्तर असल्याचे तालिबानने स्पष्ट केलेय.

काबूलवरील पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून नांगरहार आणि कुनार प्रांतातील डुरंड रेषेजवळील पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर हल्ले केल्याचे खालिद बिन वालिद आर्मी कॉर्प्सने स्पष्ट केले. हुर्रियत रेडिओ इंग्लिशने वृत्त दिले आहे की १२ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आणि सहा जणांना जिवंत पकडले गेले. तालिबानी हल्ल्यात पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने चौक्या सोडून पळ काढल्याचेही अफगाण मिडियाने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिरपूर उपनगराध्यक्ष पदावर भाजपचे संगिता देवरे यांची निवड

Crime News : बाबा मला मासिक पाळी आलीये...मुलगी विनवण्या करत होती, पण पैशांना हपापलेल्या बापानं सौदा केला, शरीरसंबंध...

"डॅडी इज होम..."; डोळ्यावर गॉगल, एका हातात गन अन् दुसऱ्या हातात सिगार, यशच्या 'Toxic'चा टीझर आऊट; पाहा VIDEO

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?

Shocking: अश्लिल व्हिडिओ पाहून ठेवायचा शरीरसंबंध, बायकोची सटकली; प्रायव्हेट पार्ट दाबून नवऱ्याला संपवलं

SCROLL FOR NEXT