वृत्तसंस्था: रशिया- युक्रेन (Ukraine) यांच्यात परत चर्चा निष्फळ ठरली आहे. या पार्श्वभूमीवर 'आजच्या आज कीव सोडा', भारतीय (Indian) दूतावासाने सूचना दिले आहेत. कीवमधील भारतीय दूतावासाने भारतीयांकरिता अलर्ट (Alert) जारी केला आहे. भारतीय नागरिकांना आज कोणत्याही परिस्थितीत सापडेल त्या मार्गाने कीवमधून बाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे.
हे देखील पहा-
भारतीय (Indian) दूतावासाने आपल्या अॅडव्हायझरीमध्ये सांगितले आहे की, कीवमधील भारतीयांसाठी सल्ला.. विद्यार्थ्यांबरोबरच (students) सर्व भारतीय नागरिकांना आज तात्काळ कीव सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अगोदरच उपलब्ध असलेल्या गाड्यांद्वारे किंवा इतर कोणत्याही उपलब्ध मार्गाने त्वरित हा देश सोडायला सांगितला आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये रशिया खूपच आक्रमक होत आहे.
युक्रेनची राजधानी (Capital) कीववर काल रात्रीपासून क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. धोका लक्षात घेऊन भारतीय दूतावासाने सर्व भारतीयाकरिता एक सूचना जारी केली आहे. अॅडव्हायझरीमध्ये सर्व भारतीयांना आज कीवमधून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. त्याला जे काही मिळणार आहे ते वापरून कीव सोडण्यास सांगितले आहे.
कीवमध्ये रशियन सैनिक सोमवारी रात्रीपासून सतत बॉम्ब (Bomb) आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहेत. कीव ताब्यात घेण्याकरिता रशिया चांगलाच आक्रमक झाला आहे. सततच्या हल्ल्यांमुळे धोका वाढला आहे. यामुळेच भारतीय दूतावासाने घाईघाईत अॅडव्हायझरी जारी केले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.