जम्मू-काश्मिर: आज संपूर्ण देशात ७५ वा स्वातंत्र्यादिन साजरा केला जात आहे. कोरोनाच्या संकटाने (Coronairus) देशात स्वातंत्र्यादिन साध्या पद्धतीने साजरा केला गेला. याच स्वातंत्र्यादिनाच्या निमित्ताने आपण एका भारतीय अवलियाचा प्रवास पाहणार आहोत. काश्मीरला भारताचं नंदनवन म्हटलं जातं, मात्र दहशतवादी कारवायांमुळे हे नंदनवन कायम अस्वस्थ असतं. संवेदनशील असणाऱ्या काश्मीरच्या भागात महाराष्ट्रातील मराठी माणूस माणुसकीची बीजे रोवत आहे. अतिरेकी कारवायांमुळे उद्धवस्त झालेल्या कुटुंबातील मुलींना आधार देण्याचं काम 'अधिक कदम' नावाचा जिगरबाज माणूस गेल्या 24 वर्षांपासून करत आहेत.
नगर जिल्ह्यातील एका सर्वसामान्य कुटुंबाततुन आलेल्या अधिक कदम यांनी पुण्यात राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना अभ्यासदौऱ्याच्या निमित्ताने ते काश्मीरला गेले होते. त्यावेळी दहशतवादामुळे उध्वस्त झालेली कुटुंब त्यांनी पहिली, यात महिला आणि मुलांचे हाल बघितल्यावर यांच्यासाठी आपण काम करायला हवे हा पक्का विचार केला. कोणत्याही कठीण प्रसंगात घरातील महिला आणि मुलांचं आयुष्य उध्वस्त होतं ते सावरण्याचं काम अधिक कदम यांनी केलं आहे.
समाजात काही बदल घडवायचे असतील तर त्याची सुरवात एका महिलेपासून केली तर पुढील काम आधी वेगाने होते असा विचार करून अधिक कदम यांनी मुलींसाठी अनाथालय सुरू केलं आणि यातूनच 'बॉर्डरलेस संस्थे'ची उभारणी केली.
जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला, अनंतनाग, फुलवामा, कुपवाडा या जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी अनाथालय आहे. आतापर्यंत अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुलींना शिक्षण देऊन लग्न लावून दिले. सगळ्याच मुलींचं कन्यादान माझ्या हातून झाले आहे, आजही अनेक मुली देशाच्या कानाकोपऱ्यात चांगलं शिक्षण घेताहेत असं अधिक कदम सांगतात.
बॉडर्रलेस र्वल्ड फाउंडेशनचा पसारा आज खूप वाढला आहे. मात्र हा प्रवास मुळीच सोपा नव्हता, अनेकदा हे कार्य अधिक कदम यांच्या जीवावर ही बेतले आहे. तब्बल 19 वेळादहशतवाद्यांनी त्यांना पकडले होते, दहशतवाद्यांकडून धमक्याही येत होत्या. स्थानिक मौलवींनी अधिक कदम यांच्या विरोधात फतवे ही काढले, पण या कशालाच न घाबरता अधिक कदम आतापर्यंत काम करत आहेत.
२००२ मध्ये अधिक बॉर्डरलेस र्वल्ड फाउंडेशनची स्थापना केली आणि कुपवाड्यातच मुस्लिम मुलींसाठी पहिले घर उभे केले. २००६ मध्ये बडगाम आणि अनंतनाग येथेही बसेरा-ए-तबस्सूम म्हणजे आनंद निवासची स्थापना झाली. एवढ्या दहशतवादीग्रस्त भागात अशी सेवा देणं नक्कीच सोपं नाहीये. त्यामुळे अधिक कदम यांना सलाम.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.