Kangana Ranaut and Kriti Sanon’s advertisement controversy saam tv
देश विदेश

कंगना-क्रितीच्या वादात राहुल गांधींची उडी; क्रिती सॅननच्या जाहिरातीनं राजकारण तापलं

Kangana vs Kriti Sanon: राहुल गांधी यांनी यात उडी घेतल्यामुळे कंगना राणौत आणि कृती सॅनन यांच्या जाहिरातीशी संबंधित वाद आता राजकीय वळणावर पोहोचला आहे.

Rohit Kadam

Kriti Sanon’s Advertisement Controversy : सणासुदीच्या काळात आकर्षक जाहिरातींचं पेव फुटतं. मात्र अशाच एका अभिनेत्री क्रिती सॅननच्या जाहिरातीवर कंगना रनौतनं आक्षेप घेतलाय. त्यामुळे वाद निर्माण झालाय. मात्र या वादात राहुल गांधी यांनी उडी घेतलीय. काय आहे हा वाद आणि राहुल गांधींनी काय भूमिका घेतलीय ? पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट.

बहीण-भावाच्या अतूट नात्याचा पवित्र सण असलेल्या रक्षाबंधनाला राजकीय रंग देण्यात आलाय. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅननच्या एका जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झालाय. क्रिती सॅनननं नुकतीच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर एका ज्वेलरी ब्रँडची जाहिराती केली. या जाहिरातीत क्रितीनं परिधान केलेल्या कपड्यांवरून वाद पेटलाय. क्रितीचे जाहिरातीतले कपडे रक्षाबंधनासाठी शोभत नसल्याची टीका भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतनं क्रितीवर केली आणि वाद पेटला. काय म्हटलीय कंगना ते पाहूयात.

महिलांसाठी ही एक उत्तम वेळ आहे. आपली कपाटं अनेक प्रकारच्या कपड्यांनी भरलीयत आणि आजची स्त्री जागतिक आहे. कॉकटेल ड्रेसपासून लेहेंगा चोळीपर्यंत, जीन्सपासून साडीपर्यंत आणि बिकिनीपासून सलवार-कमीजपर्यंत, आज आपल्याकडे कपड्यांचे इतके पर्याय आहेत. मग तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंडरगारमेंट्समध्ये राखी का बांधणार? तुमच्याकडे स्टाइलिंगचे इतके पर्याय कुठे गेले? ही जाहिरात जाणूनबुजून विचित्र बनवलेली दिसते. कंगनाच्या या पोस्टनंतर क्रितीनंही तिला सडेतोड उत्तर दिलंय. संस्कृती हृदयात असते, नेकलाइनमध्ये नाही, असं म्हणत क्रितीनं कंगनाचा समाचार घेतलाय.

एथनिक फॅशनमध्ये वेळेनुसार बदल झालाय. मात्र आजही महिलांच्या संस्कृतीबद्दलच्या आदराला केवळ त्यांच्या कपड्यांवरूनच मोजलं जातं. समाज महिलांनी काय घालावं हे सांगणं कधी बंद करेल? संस्कृती आणि परंपरा माणसाच्या हृदयात असतात, त्याच्या नेकलाइनमध्ये नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Singer: जिमबाहेर घात लावून बसले, बाहेर येताच गायकावर झाडल्या धाडधाड २० गोळ्या

Video : दहाव्या मजल्यावरुन महिला पडली, झाडामुळे बचावली, रेस्क्यू ऑपरेशन

Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; निष्ठावंत नेत्याचा राजीनामा,४ माजी नगरसेवकांसह शिवसेनेत करणार प्रवेश

Tukaram Munde Action : तुकाराम मुंढेंच्या रडारवर अंगणवाड्या! निकृष्ट पोषण आहाराची तपासणी

Maharashtra News Live Update: आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांनी मागितला वेळ

SCROLL FOR NEXT