Chaos at Vijay Thalapathy’s rally in Karur, Tamil Nadu, where a stampede left 10 people dead and many injured. saam tv
देश विदेश

Stampede In Rally: अभिनेता विजय थलपथीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, १० जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Vijay Thalapathy Party Rally Stampede: तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजय थलपथी यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक जण जखमी झाले आहेत. बळींमध्ये मुलांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे.

Bharat Jadhav

तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजय थलपथीच्या रॅलीत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. यात १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये मुलांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने मुलांसह किमान १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजय थलपथीच्या रॅलीत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. यात १० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये मुलांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. TVK (तमिलगा वेट्टी कळघम) प्रमुख आणि अभिनेता विजय यांनी नमक्कलमध्ये या रॅलीचे आयोजन केले होते.

त्याचवेळी चेंगराचेंगरीची घटना घडली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते असे वृत्त आहे. गर्दी इतकी वाढली की चेंगराचेंगरी झाली. अभिनेता विजय थलपथी जमावाला संबोधित करत होते. त्याचवेळी चेंगराचेंगरीची घटना घडली असून यात लोक बेशुद्ध पडले. त्यामुळे विजय थलपथी यांना त्यांचे भाषण थांबवावे लागले.

दरम्यान जखमींना करूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. थलपथीच्या सभेला इतकी गर्दी झाली की, लोकांना श्वास घेणेही कठीण झाले होते. त्यामुळे उपस्थित असलेले लोक आणि कार्यकर्ते बेशुद्ध पडू लागले. त्यानंतर अभिनेता विजयने आपले भाषण थांबवले आणि जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केलं.

त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना गरजूंना मदत करण्याचे आणि त्यांना रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याचे आवाहन केले. याच काळात एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आल्याचे वृत्त आहे. तिच्या सुरक्षेसाठी पोलिसांना सक्रिय करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री

Maharashtra Politics: आघाडीची थाटात घोषणा पण आठ दिवसातच काडीमोड; वंचित-काँग्रेसचं काही जमेना

8000mAh बॅटरी, कॅमेरा, फीचर्स आणि डिजाइनही जबराट; बाजारात हटके मोबाईल लाँच होणार?

Pune : गावाकडून शहराकडे...! पुण्यात कोयता गँगनंतर बिबट्याची दहशत; सतर्क राहा पण घाबरू नका, वन विभागाचं आवाहन

SCROLL FOR NEXT