Varisu Movie: थलपथी विजयच्या 'वरिसू' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पिछेहाट, पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठ

वरिसू हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे.
Varisu Movie First Day Collection
Varisu Movie First Day CollectionInstagram @thalapathy__vijay

Varisu Box Office Collection: थलपथी विजय हा साऊथ इंडस्ट्रीतील खूप मोठा सुपरस्टार आहे. यश प्रमाणेच जेव्हा त्याचा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा एखाद्या सणासारखे वातावरण असते. थलपथी विजयचे अनेक सिनेमे यावर्षी प्रदर्शित होणार आहेत. यापैकी एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. थलपथी विजयचा 'वरिसू' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ओपनिंग दिवशी चित्रपटाने किती कमाई केली आहे, पाहूया.

वरिसू हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाला. रश्मिका मंदान्ना या चित्रपटात थलपती विजय सोबत मुख्य भूमिका साकारत आहे. दोघेही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मोठी नावे आहेत. देशभरात या दोन्ही स्टारची असंख्य फॅन फॉलोइंग आहे.

Varisu Movie First Day Collection
Farzi Trailer Out: शाहिद कपूर-विजय सेतुपती डिजिटल डेब्यूसाठी सज्ज, 'फर्जी'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाच्या 'ओपनिंग डे' बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 20 कोटींची कमाई केली आहे. जी विजयच्या गेल्या काही चित्रपटांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

दक्षिणेत थलपती विजयचा चित्रपट प्रदर्शित झाला की सणासुदीचे वातावरण पाहायला मिळते. जेव्हा त्याचा 'बीस्ट' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता तेव्हा त्या चित्रपटाने 35 कोटींची कमाई केली होती. याशिवाय त्याच्या 'सरकार' या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३१.६ कोटींची कमाई केली होती. त्याच्या मास्टरने 25.3 कोटी, बिगिलने 24.3 कोटी आणि मर्सलने 23.3 कोटींची कमाई केली होती. अशा परिस्थितीत, विजयचा हा चित्रपट इतर यशस्वी चित्रपटांच्या तुलनेत थोडा कमी पडला आहे असे दिसत आहे.

चित्रपटाच्या कलेक्शन कमी होण्यामागे २ मोठी कारणे आहेत. सहसा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होतात. या काळात लोक आधीच वीकेंड मोडमध्ये असतात आणि सुरुवातीच्या दिवशी बरेच लोक चित्रपट पाहण्यासाठी जातात. वरिसूबद्दल बोलायचे तर हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित न होता गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. आता वरिसू गुरुवारी म्हणजेच कामकाजाच्या दिवशी प्रदर्शित झाला आहे. यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये इतका फरक दिसून येत आहे.

या चित्रपटासोबतच अजित कुमारचा थुनिवू हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे प्रेक्षक विभागले गेले आहेत. त्यामानाने वरिसूच चित्रपटाचे कलेक्शन तितकसे वाईट म्हणता येणार नाही. चित्रपटाचा पहिला वीकेंड आहे. त्यामुळे हा चित्रपट अजूनही बक्कळ कमाई करू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com