GPS वर डोळे झाकून विश्वास ठेणे दोन डॉक्टरांच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. जीपीएसने दाखवलेल्या रस्त्याने कार घेऊन गेल्याने दोन डॉक्टरांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. दुर्दैवी बाब म्हणजे यातील एका डॉक्टरचा त्याच दिवशी वाढदिवस होता.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील गोथरुथ येथील ही घटना आहे. रविवारी रात्री १२.३०च्या दरम्यान ही घटना घडली. या दुर्घटनेत डॉ. अद्वैत आणि डॉ. अजमल आसिफ यांचा मृत्यू झाला आहे. डॉ. अद्वैत यांचा रविवारी वाढदिवसही होता. (Latest News Update)
डॉ. अद्वैत चार मित्रांसह कोचीहून कोडुंगल्लूरला वाढदिवसाच्या खरेदीसाठी गेले होते. तेथून परतताना रात्री मुसळधार पाऊस आणि अंधार असल्याने योग्य रस्ता दाखवण्यासाठी त्यांनी जीपीएसचा आधार घेतला.
मात्र जीपीएस त्यांना मृत्यूचा मार्ग दाखवत आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. जीपीएसच्या सूचनेनुसार ते सरळ चालत राहिले. मात्र एका जागी जीपीएसने त्यांना जो रस्ता दाखवला तो रस्ता थेट नदीत जात होता.
मात्र जीपीएसच्या सूचनेनुसार कार नेल्याने कार थेट नदीत बुडाली. कारमधून तीन जण कसेबसे बाहेर पडले. मात्र डॉ.अद्वैत आणि डॉ. अजमल आसिफ यांना बाहेर निघणे शक्य झाले नाही. यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. मात्र या घटनेत नेमकी मानवी चूक होती की तांत्रिक चूक होती, याबाबत आताच स्पष्ट सांगता येणार नाही.
पावसाळ्यात, GPS अल्गोरिदम ड्रायव्हर्सना कमी रहदारी असलेल्या रस्त्यांचा मार्ग दाखवतात. परंतु ते रस्ते सुरक्षित असतातच असे नाही.
पावसात रात्रीच्या वेळी जीपीएस सिग्नलमध्ये लॉस्ट होतात, त्यामुळे रस्ताही वेगळा दाखवला जाऊ शकतो. अशावेळी नेहमीच्या रस्त्याने जाणे कधीही सोयीचे ठरु शकते, असं तज्ज्ञ सांगतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.