'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Elon Musk’s Flying Car Sparks: प्रसिद्ध उदयोगपती एलन मस्क यांच्या 'टेस्ला'नं बनवलेल्या रोडस्टर या उडत्या कारची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगलीये. उडत्या कारवरून नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स तयार केले आहेत. पाहूयात भारतीयांच्या क्रिएटिव्हीटीवरचा हा खास रिपोर्ट...
TESLA FLYING CAR MEMES VIRAL
TESLA FLYING CAR MEMES VIRALsaam tv
Published On: 

टेस्लाची रोडस्टर फ्लाईंग कारची जगभरात चर्चा रंगलीये. मात्र, एलन मस्क यांच्या तंत्रज्ञानातील या आविष्काराची भारतात चर्चा रंगली नसती तरच नवल... मस्क यांच्या फ्लाईंग कारवर भारतीयांनी सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. या फ्लाईंग कारवरून नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स तयार केले आहेत. विशेष म्हणजे, हे मीम्स इतके गंमतीशीर आहेत की, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. म्हणे, आयुष्यात फक्त दोन वेळा आनंद झाला. एक, देश स्वतंत्र झाला होता तेव्हा. आणि आज, तुझं यश पाहून आनंद होतोय...

तर दुसरीकडे, एका चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा आपल्या पत्नीला उडणाऱ्या गाडीविषयी माहिती देत आहेत. गंमत म्हणजे, या क्लिपचा वापर करून एक मजेशीर मीम तयार करण्यात आलंय. एव्हंढच नव्हे तर आपल्या अॅक्शन चित्रपटांमुळे चर्चेत असलेले बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या चित्रपटातील एका अॅक्शन क्लिपचा वापर नेटकऱ्यांनी केलाय.

2015 साली ‘अंबाला’ या दक्षिण भारतीय चित्रपटातही उडणारी गाडी दाखवली होती. या मीमचा वापर करून मस्क यांची गाडी भारतीय गाड्यांसमोर कशी फिकी आहे, असं सांगत नेटकऱ्यांनी मिश्किल दाद दिलीये..

टार्झन: द वंडर कार’ या चित्रपटातील सीनचा वापर करून टेस्लाच्या कारचं पुढचं व्हर्जन कसं असेल, याची कल्पना याची भन्नाट कल्पना मांडलीये.

पाहिलंत... जगात कुठेही काहीही अद्भुत घडो... त्यात एलन मस्क असोत किंवा त्यांची टेस्ला रोडस्टर कार... भारतातील नेटकऱ्यांच्या भन्नाट क्रिएटिव्हिटीला काही तोड नाही... हेच खरं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com