Delhi Footpath Truck Accident Saam TV
देश विदेश

Accident News : पुन्हा हिट अँड रनचा थरार! फुटपाथवर झोपलेल्या 5 मजुरांना भरधाव ट्रकने चिरडलं; तिघांचा जागीच मृत्यू

Delhi Footpath Truck Accident : फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना भरधाव ट्रकने चिरडलं. या घटनेत तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले.

Satish Daud

फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना भरधाव ट्रकने चिरडलं. या घटनेत तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना उत्तर-पूर्व दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात रविवारी पहाटे पाऊणेचार वाजेच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पूर्व दिल्लीतील (Delhi News) शास्त्री पार्क परिसरात असलेल्या एका फुटपाथवर काही मजूर झोपले होते.

साखर झोपेत असताना त्यांच्यावर अचानक काळाने घाला घातला. भरधाव वेगात आलेला ट्रक अनियंत्रित होऊन फुटपाथवर चढला. अपघात (Accident) इतका भीषण होता, की पाचही मजूर ट्रकच्या चाकाखाली आले. यातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी आरडाओरड झाली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोक आपल्याकडे येत असल्याचे पाहून ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरुन पसार झाला. काहींनी ट्रकचा नंबर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधारात काहीही दिसत नसल्याने ट्रकची माहिती मिळू शकली नाही.

अपघातासंदर्भात माहिती देताना दिल्लीतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, "ट्रकचाकाविरोधात शास्त्री पार्क पोलिस ठाण्यात कलम 281,106,125A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्याकडून अपघाची माहिती घेतली जाईल. तसेच मृतांची ओळख देखील पटवणे शक्य होईल".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT