Car Accident News Saam Tv
देश विदेश

Accident News : दुर्दैवी! ड्रायव्हरच्या डुलकीनं घात झाला, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; महाकुंभाहून परतताना अपघात

Road Accident News : प्रयागराजहून घरी परतत असताना कारचा अपघात झाला. ड्रायव्हरला पेंग आल्याने कार ट्रकवर जाऊन आदळली. अवघ्या पाच मिनिटांमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

Yash Shirke

Car Accident News : प्रयागराजमध्ये महाकुंभात स्नान करुन घरी परतत असताना एका कुटुंबातील सहा जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जगदीशपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरा-मोहनिया राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळच्या सुमारास कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये नवरा, बायको, त्यांच्या दोन मुलींसह सहा जणांचा मृत्यू झाला. ड्रायव्हरला डुलकी आल्याने अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब पटना येथे त्यांच्या घरी प्रयागराजहून जात होते. तेव्हा पटन्यापासून ४० किमी आधी आरा-मोहनिया राष्ट्रीय महामार्गावर एका पेट्रोल पंपाजवळ कारचा अपघात झाला. ही कार रस्त्याच्या शेजारी असलेल्या ट्रकला जाऊन आदळली. अपघात इतका भयंकर होता की, अवघ्या पाच मिनिटांमध्ये कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर जमलेल्या लोकांनी पोलिसांना संपर्क केला. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी बचावकार्य सुरु केले. पण त्याआधीच कारमधल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तींमध्ये पटना येथे राहणाऱ्या संजय कुमार, करुणा देवी, लाल बाबू सिंह, जूही राणी, आशा किरण, प्रियम कुमारी यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व प्रवासी प्रयागराजला महाकुंभमेळ्यासाठी गेले होते. घरी येत असताना त्यांच्या कारच्या ड्रायव्हरला झोप लागली आणि कार एका ट्रकवर जोरात आदळली. कार ट्रॅकला आदळण्याचा आवाज २०० मीटर पर्यंत पोहोचल्याचे लोकांनी पोलिसांना सांगितले. यावरुन हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT