वृत्तसंस्था Twitter/@ANI
देश विदेश

राजस्थानमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि बस धडकेत आगीचा भडका; पाच जणांचा होरपळून मृत्यू

राजस्थान बाडमेरमध्ये प्रवासी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे.

वृत्तसंस्था

जयपूर : राजस्थान बाडमेरमध्ये प्रवासी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि जोरात धडकेमुळे या गाड्यांनी तात्काळ पेट घेतला. या दुर्घटनेत आगीमुळे पाच प्रवाशांचा होरपळून 5 People died मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य Rescue work सुरू करण्यात आले आहे. अपघातातील Accident जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात Hospitalized दाखल करण्यात आले आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी CM Of Rajsthan घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी प्रवासी बसमध्ये एकूण २५ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. त्यानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला अशी माहिती आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharmendra - Sunny Deol: 'बॉर्डर २'च्या टीझर लाँच दरम्यान सनी देओलचं डोळे पाणावले, नेमकं झाल काय? VIDEO

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Expressway Accident : मुंबई एक्सप्रेसवेवर भयानक अपघात, भल्या पहाटे पिकअपचा कोळसा, ३ जण जिवंत जळाले

ZP School Jobs: तयारीला लागा! जिल्हा परिषद शाळेत ८००० शिक्षकांची भरती; निवडणुका संपताच नोटिफिकेशन निघणार

नवं वर्ष लय 'महाग' जाणार! मोबाइल कंपन्यांचे रिचार्ज २० टक्क्यांपर्यंत वाढणार, 'खिसाफाड' रिपोर्टमधील दाव्यानं यूजर्सना धडकी

SCROLL FOR NEXT