Abhijeet Dipke News  Abhijeet Dipke
देश विदेश

Abhijit Dipke : जंतर-मंतरवर अभिजित दिपकेंना पोलिसांची मारहाण, आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न, खळबळजनक आरोप

Abhijit Dipke, Delhi Police, Jantar Mantar protest : जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांनी मारहाण करून बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे.

Namdeo Kumbhar

Abhijit Dipke alleges assault by Delhi Police : २१ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवरून हटवल्यानंतर, आता या आंदोलनाला पाठिंबा देणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. 'मला दिल्ली पोलिसांनी मारहाण केली आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा' खळबळजनक दावा दिपके यांनी केला आहे. दीपके यांनी एक्स खात्यावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

सोनम वांगचुक यांच्या जंतर-मंतरवरील उपोषणाचा आज २१ वा दिवस होता. त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगत दिल्ली पोलिसांनी आज सकाळीच त्यांना आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले. या कारवाईचा निषेध करणाऱ्या आणि आंदोलनात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये अभिजित दिपके यांचाही समावेश आहे.

अभिजित दिपके यांनी काय म्हटले?

दिपके यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या पोलीस कारवाईचा विरोध करत असताना दिल्ली पोलिसांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यांना केवळ ताब्यातच घेतले नाही, तर मारहाणही करण्यात आली. शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आंदोलन पेटण्याची शक्यता

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये त्याचा समावेश व्हावा, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. आधी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करणे आणि आता त्यांच्या समर्थनात उभ्या असलेल्या अभिजित दिपके यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना मारहाण करत ताब्यात घेतल्यामुळे आंदोलक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता दिल्ली पोलीस काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आणि आरोग्य स्थिती तसेच वैद्यकीय सल्ल्याच्या आधारे, सोनम वांगचुक यांना अत्यंत आवश्यक असलेल्या वैद्यकीय उपचारांसाठी येथून शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.
नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त (DCP) सचिन शर्मा

पहाटेच्या वेळी त्यांनी साधारण दहा पोलीस अधिकारी पाठवले, जे स्वतःला वैद्यकीय पथक (मेडिकल टीम) म्हणवून घेत होते. पण ते डॉक्टरसारखे दिसत नसल्याने ते पोलीसच आहेत हे आमच्या लक्षात आले आणि त्यांनी सर्व स्वयंसेवकांना बाजूला होण्याचे आदेश दिले. आम्ही त्यांना वारंवार थोडा वेळ थांबण्याची विनंती करत होतो, पण अचानक त्यांनी हायकोर्टाचा (उच्च न्यायालयाचा) आदेश असल्याचे सांगत सोनम सरांना घेऊन जाणे आवश्यक असल्याचे जाहीर केले. दरम्यान, अभिजित नुकताच वॉशरुमला गेला होता; मला असे वाटते की पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे आणि म्हणूनच तो इथे येऊ शकत नाहीये, तसेच त्याचा फोनही लागत नाहीये... ते सर्व पोलीस साध्या कपड्यांमध्ये (सिव्हिल ड्रेसमध्ये) आले होते, असे एका आंदोलनकर्त्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी लॉटरी! थेट ₹१४,००० ने स्वस्त होणार सोनं? केंद्र सरकारच्या एका निर्णयाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: डेंग्यू-चिकुनगुनिया रोखण्यासाठी कर्मचारी नेमा, महापालिकेच्या आरोग्य विभागाला सूचना

Kapuskonda Movie: सचिन पिळगावकर-मधुराणी गोखले पुन्हा आमनेसामने; 'कापूसकोंडा' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Pune : दररोज ₹५०० च्या परताव्याचं आमिष आणि थेट ३३ लाखांचा गंडा, पुण्यातील डॉक्टर-व्यापारी पती-पत्नीचा कारनामा

Manoj Jarange: मनोज जरांगे आंदोलनावर ठाम! आधी आंतरवाली सराटी एल्गार, नंतर चलो मुंबईचा नारा; संपूर्ण आंदोलनाचा प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT