Delhi Politics Saam Tv
देश विदेश

Delhi Politics: लोकसभा निवडणुकीदरम्यान आपच्या आणखी ४ नेत्यांना अटक होणार; आतिशी मार्लेना

BJP Will Ed Raid On 4 Aap Leader: आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर भाजप आपच्या आणखी चार नेत्यांना तुरूंगात टाकणार असा खळबळजनक दावा केला आहे.

Rohini Gudaghe

Delhi Politics Atishi Claim On BJP

भाजप (BJP) 'आप'च्य ४ नेत्यांना लोकसभा निवडणुकीदरम्यान पुढच्या २ महिन्यात तुरुंगात टाकणार आहे, असा खळबळजनक आरोप आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी केला आहे. मी, सौरभ भारद्वाज, राघव चढ्ढा, दुर्गेश पाठक यांना सरकार जेलमधे टाकणार आहे, असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं (Delhi Politics) आहे. (latest politics news)

मला भाजपमधे सहभागी होण्यासाठी भाजपमधील जवळच्या व्यक्तीकडून विचारणा करण्यात आली आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला (Aap Leader Atishi Claim On BJP) आहे. मी जर भाजपमध्ये गेले नाही, तर मला अटक केली जाणार असं वक्तव्य त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलं (Delhi Politics News) आहे. त्या म्हणाल्या की, ईडी माझ्या घरावर छापा टाकू शकते. येत्या काही दिवसांत मला तुरुंगातही टाकलं जाऊ शकतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी यांनी खुलासा केला की, भाजपच्या एका नेत्याने त्यांच्याशी संपर्क साधला आहे. करिअर वाचवायचं असेल तर लवकरात लवकर भाजपमध्ये (Politics News) जावं, अन्यथा अटकही केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे. भाजपला आम आदमी पार्टीला संपवायचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना आतिशी मार्लेना यांनी अरविंद केजरीवाल राजीनामा देणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यांच्यासोबत सौरभ भारद्वाज, राघव चढ्ढा आणि दुर्गेश पाठक यांना लवकरच अटक करण्यात येणार ( Ed Raid On Aap Leader) आहे. त्यांच्या घरांवरही छापे टाकले जातील आणि त्यानंतर समन्स पाठवले जातील. त्यांना अटक करण्याची भाजप सरकारची योजना असल्याचं आतिशी (Aap Leader Atishi) यांनी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या की आम्ही भाजपच्या या धमक्यांना घाबरणार नाही.

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) तपासात सहकार्य करत नाहीत आणि तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे. भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यावर याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे. त्यामुळे त्यांनी जाणूनबुजून आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज यांची नावं या कथित दारू घोटाळ्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला (Lok Sabha Elections) आहे. सुनीता केजरीवाल यांचा राजकीय मार्ग मोकळा करण्याचा हा प्रयत्न असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT