मेक्सिको अपघातः स्थलांतरित लोकांना नेणारा ट्रक कोसळला, 49 जणांचा मृत्यू, 58 जण जखमी Saam Tv
देश विदेश

मेक्सिको अपघातः स्थलांतरित लोकांना नेणारा ट्रक कोसळला, 49 जणांचा मृत्यू, 58 जण जखमी

मेक्सिकोमध्ये गुरुवारी रात्री उशिरा २ ट्रकमध्ये भीषण अपघात झाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : मेक्सिकोमध्ये (Mexico) गुरुवारी रात्री उशिरा २ ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. चियापास मधील (Chiapas) दक्षिण- पूर्व मेक्सिकन शहर तुक्स्टला गुटिरेझ जवळच २ ट्रकची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातमध्ये ४९ जण ठार, तर ५८ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. बचाव पथकाने (Mexico Rescue squad) ही माहिती दिली आहे. (A truck carrying people to Mexico crashed)

हे देखील पहा-

या भीषण अपघातामध्ये एका ट्रकमध्ये मध्य अमेरिकेमधील १०० हून अधिक प्रवासी होते. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये ५८ जण जखमी झाले असून, त्यापैकी ३ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये ४९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बचाव पथकाने गुरुवारी रात्री उशिरा फेसबुकवर दिली आहे.

चियापासचे गव्हर्नर रटिलियो एस्कंडन (Governor Ratilio Eskandon) यांनी पीडितांच्या कुटुंबीयांप्रति दु:ख व्यक्त केले आहे. या अपघातासाठी जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वास त्यांनी दिले आहे. अद्याप या मृतांची कोणतीही ओळख पटली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT