बीड : शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाई (Ambajogai) येथील बलात्कार प्रकरणी, 24 तासात एका पोलीस (police) कर्मचार्यासह होमगार्ड आणि सेवानिवृत्त नायब तहसीलदाराला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बीडच्या (Beed) अंबाजोगाईत सहा महिन्यांपासून घराबाहेर पडलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 400 पेक्षा अधिक जणांनी अत्याचार (atrocity) केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
हे देखील पहा-
या प्रकरणात 8 नोव्हेंबर रोजी अंबाजोगाईच्या ग्रामीण (Rural) ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एक एक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी 2 महिला दलाल व मुख्याध्यापकासह इतर 7 आरोपींना 17 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. तर अत्याचार करणार्यांमध्ये पोलिस कर्मचार्याचा समावेश असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर, न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढत आरोपीला अटक (Arrested) का होत नाही? असा प्रश्न उपस्थितीत केला होता. (Home Guard and Deputy Tehsildar arrested along with police personnel)
न्यायालयाच्या याच भूमिकेमुळे पोलिसांनी गेल्या 24 तासामध्ये आणखी 8 जणांना अटक केली असून यामध्ये एक पोलिस कर्मचारी, एक होमगार्ड, लॉज चालक असलेले एक माजी नायब तहसीलदारांसह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आजपर्यंत 20 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी फोनवरून दिली आहे. मात्र, याप्रकरणात 400 पेक्षा अधिक जणांनी अत्याचार केल्याचे पिडीतीने जबाबात म्हटल्याने, तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.