वृत्तसंस्था : जगभरामध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने म्हणजेच ओमायक्रॉनने आता चांगलंच हातपाय पसारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणखी काही काळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या सिव्हिल एव्हिएशनने काढलेल्या ताज्या आदेशानुसार, आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय हाती घेण्यात आला आहे. (International flights now closed until January 31)
हे देखील पहा-
या निर्णयानुसार भारतात येणाऱ्या आणि भारतातून बाहेर जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांना स्थगिती देत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जगभरामध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. भारतात देखील त्याचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर एका देशातून दुसऱ्या देशात हा व्हेरिएंट पसरू नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित कऱण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.
नव्या निर्णयानुसार आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्यात येणार आहे. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती बघून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकारने तातडीचा हा आदेश काढल्याने भारतात येणाऱ्या आणि भारतामधून परदेशात जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांना आता त्यांचे नियोजन बदलावे लागणार आहे. प्रवासी विमानसेवेकरिता केंद्र सरकारने काढलेला हा नवा आदेश लागू असला तरी कार्गो सेवा मात्र पूर्ववत सुरू राहणार आहेत.
त्याचप्रमाणे काही खास विमानफेऱ्यांनाच परवानगी देण्यात येऊ शकते, असे या आदेशामध्ये सांगितले आहे. मात्र, त्याकरिता DGCA ची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. ज्या विमानांच्या फेऱ्यांचे अगोदरचे बुकिंग करण्यात आले आहे, त्यांना विशिष्ट अटीवर प्रवासाची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, ही परवानगी सरसकट सर्व फेऱ्यांकरिता नसून प्रत्येक फेरीबाबत स्वतंत्रपणे निकष तपासून निर्णय घेतला जाणार आहे. (International flights now closed until January 31)
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.