Crime News
Crime News Saam Tv
देश विदेश

Crime News: धक्कादायक! पहिलीतल्या विद्यार्थ्याने शिक्षिकेवर झाडली गोळी, प्रकृती गंभीर

Gangappa Pujari

New Port News : सध्या अल्पवयीन मुलांची वाढती गुन्हेगारी हा सर्वत्र चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. परंतु अवघ्या सहा वर्षाच्या मुलानेच एखादा गंभीर गुन्हा केला तर.. सहा वर्ष वय म्हणजे खेळण्याच, बागडण्याच वय. मात्र या लहान वयात मुलांना धोकादायक वस्तू हाताळण्यास दिल्यास कसा धक्कादायक प्रकार घडू शकतो, याचे उदाहरण देणारी घटना समोर आली आहे. (Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, व्हर्जिनियातील न्यूपोर्ट न्यूज शहरात घडलेल्या या घटनेत फर्स्ट ग्रेड वर्गातील म्हणजे पहिलीतील सहा वर्षांच्या विद्यार्थ्यांने आपल्या शिक्षिकेवर गोळी झाडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (6 जानेवारी) वर्गातील किरकोळ भांडणादरम्यान ही घटना घडली. या घटनेमध्ये शिक्षिका गंभीर जखमी झाली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबतची बातमी प्रसिद्ध केली आहे.

न्यूपोर्ट न्यूज' या शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीस आणि शाळेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सहा वर्षांच्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकेवर गोळी झाडली आहे. रिचनेक एलिमेंटरी स्कूलमध्ये झालेल्या या गोळीबारात कोणताही विद्यार्थी जखमी झालेला नाही. मात्र, शिक्षिका गंभीर जखमी झाली आहे. पोलीस प्रमुख स्टीव्ह ड्र्यू यांनी पत्रकारांना सांगितलं की, उपचारांनंतर या शिक्षिकेची प्रकृती काहीशी सुधारली आहे.

पोलिसांनी गोळी झाडणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडील हँडगनदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. हा गोळीबार अपघात नव्हता. तो जाणीवपूर्वक केलेला जीवघेणा हल्ला आहे. असाही खुलासा यावेळी पोलिसांनी केला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT