भूतदयेचं जिवंत उदाहरण! गेल्या १५ वर्षांपासून शेकडो भटक्या श्वानांना अन्न भरवणारी माता... Twitter/@ANI
देश विदेश

भूतदयेचं जिवंत उदाहरण! गेल्या १५ वर्षांपासून शेकडो भटक्या श्वानांना अन्न भरवणारी माता...

महाराष्ट्रातील सर्व संतांनी देखील आपल्याला भूतदयेची शिकवण दिली आहे. मुक्या प्राण्यांना खाऊ घाला, त्यांना त्रास देऊ नका.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगळुरु, कर्नाटक: तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा, कोणत्याही संताची पुजा करा, पण जर तुम्ही दारात आलेल्या कुत्र्याला खायला चतकोर भाकरीचा तुकडा देत नसाल तर तुमची पुजा व साधना व्यर्थ आहे. देव तुम्हाला कधीच प्रसन्न होणार नाही, प्राण्यांना माणुसकीनं (Animal kindness) वागवणं यालाच भुतदया म्हणतात. सर्व साधु संत यांनी हेच सांगितलं होतं. कर्नाटक (Karnataka) राज्यात ८०० भटक्या कुत्र्यांचा (Dogs) सांभाळ करणाऱ्या रजनी शेट्टी (Rajni Shetty) हे भूतदयेचं जिवंत उदाहरण आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ते रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा सांभाळ करतायत. (A living example of animal lover! Mother who have been feeding hundreds of stray dogs for the last 15 years)

हे देखील पहा -

कर्नाटकच्या मंगळुरू (Mangaluru) येथील रहिवासी, रजनी शेट्टी दररोज 800 भटक्या कुत्र्यांना खायला घालतात, त्यांचं पालन पोषण करताता. त्यांच्या घरी डझनभर कुत्रे, मांजर, ससे, पक्षी इत्यादी सर्वकाही आहेत. त्यांचं घर म्हणजे प्राण्यांसाठीचं नंदनवन आहे. रजनी ह्या प्राण्यांसाठी स्वतः अन्न बनवतात, एवढंच नाही तर हे प्राणी-पक्षी जखमी असेल तर त्या त्यांच्यावर उपचार देखील करतात. त्यामुळे भूचदयेचं, प्राणी प्रेमाचं हे मुर्तीमंत उदाहरण आपल्याला प्रेरणा देणारं आणि समाजासमोर आदर्श ठेवणारं आहे.

रजनी यांच्या या प्राणीसेवेत त्यांचे पती देखील त्यांना मदत करतात. रजनी सांगतात की, "मी कुत्र्यांना अन्न द्यायला सुरुवात केल्यापासून 15 वर्षे झाली आहेत, आज मी लोकांच्या पाठिंब्याने 800 कुत्र्यांना खाऊ घालते. मी माझ्या घरी जखमी आणि असहाय्य अशा जनावरांना उपचारासाठी घेऊन येते. आम्ही दररोज रात्री ८ नंतर कुत्र्यांना अन्न देण्यासाठी जातो, जेणेकरून त्यांच्यापैकी कोणालाही वाहनांमुळे कोणतीही अडचण येऊ नये. माझे पती, कुटुंब आणि जनतेचा मला पाठिंबा आहे. मी 800 कुत्र्यांसाठी दररोज 60 किलो पेक्षा जास्त चिकन-भात शिजवते अशी माहिती रजनी शेट्टी यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील सर्व संतांनी देखील आपल्याला भूतदयेची शिकवण दिली आहे. मुक्या प्राण्यांना खाऊ घाला, त्यांना त्रास देऊ नका. हे प्राणी देखील आपल्या सृष्टीचा अविभाज्य भाग आहेत त्यामुळे आपणही प्राणीमात्रांवर दया आण प्रेम केलं पाहिजे, यालाच खरी भूतदया आणि माणुसकी म्हणातात.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nawab Malik News : मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांचा पराभव | Marathi News

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

SCROLL FOR NEXT