ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नवरात्रीला नऊ दिवस उपवास असतात. त्यात काय जेवण करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच असतो.
काही लोक उपवासात कांदा आणि लसून घातलेले पदार्थ खात नाही . त्यांच्यासाठी एक उत्तम पदार्थ म्हणजे पनीर मखनी.
अनेक जणांना वाटतं की , कांदा-लसून न घालता स्वादिष्ट जेवण होणं अशक्य आहे. त्यांच्यासाठी खास रेसिपी.
१५ पनीरचे बारिक तुकडे, ६ तुकडे बटर, २ दालचिनी, १ मोठी इलायची, ३ वेलची, १ वाटी टॉमॅटो प्युरी, २ चमचे लाल तिखट, १ चमचा साखर, १ चमचा टॉमॅटो सॉस, १ चमचा मिठ, दीड कप पाणी, दीड कप फ्रेश क्रिम, १ चमचा कस्तुरी मेथी, दोन चमचे किसलेले पनीर इ.
सर्वप्रथम एक पॅन गॅसवर ठेवा. त्यात बटर अॅड करा. ते वितळताच दालचिनी आणि वेलची टाका. वेलची व्यवस्थित भाजल्यावर त्यात टॉमॅटोची प्युरी मिक्स करा. ते व्यवस्थित शिजवून घ्या.
आता गॅस स्लो करा. त्यात मिठ, लाल तिखट, साखर आणि पनीरचे तुकडे अॅड करा. हे मिश्रण छान मिक्स करून घ्या. या मिश्रणात थोडं पाणी टाकून त्यावर झाकन ठेवा. ५ मिनिटांनी ते झाकन काढा आणि त्यात कस्तुरी मेथी मिक्स करा.
त्यात आता टॉमॅटो सॉस आणि फ्रेश क्रिम अॅड करा. याला एक कढ आल्यावर गॅस बंद करा. आता किसलेले पनीर अॅड करा आणि डीश सर्व्ह करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.