तामिळनाडू अग्नितांडव; फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, सहा जणांचा मृत्यू  Saam Tv
देश विदेश

तामिळनाडू अग्नितांडव; फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, सहा जणांचा मृत्यू

तामिळनाडू मधील कालाकुरिची जिल्ह्यातील शंकरपूरम या ठिकाणी आग लागल्याने भीषण दुर्घटना घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : तामिळनाडू मधील कालाकुरिची जिल्ह्यातील शंकरपूरम या ठिकाणी आग लागल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. शहरातील फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे देखील पहा-

सर्वांवर उपचार सुरू आहेत. फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीनंतर ज्वाळांचे प्रचंड लोट उठलेले बघायला मिळाले आहे. या घटनेचे काही दृश्यंही समोर आली आहेत. व्हिडिओमध्ये परिसर धुराने भरलेला बघायला मिळत आहे, तर फटाक्यांचा आवाजही ऐकू येत होता.

दुर्घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाणार आहे.

जे जखमी झाले आहेत आणि इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत, त्यांना १ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन सांगितले आहे. या अगोदर जून महिन्यात एका अवैध फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात २ जणांचा मृत्यू झाला होता. मागील वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीत लागलेल्या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 9 वर्षांनंतर अचानक समोर आला बॉयफ्रेंड आणि....! लॉन्ग डिस्टन्स कपलचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Tilgul Ladoo: तिळगुळ लाडू मऊ होण्यासाठी वापरा 'या' ३ सोप्या ट्रिक्स; ही आहे सोपी रेसिपी

Pune : प्रशांत जगतापांचे गुंड टिपू पठाणशी "घनिष्ट" संबंध? जामिनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आरोप

Maharashtra Live News Update : पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शो

PF Withdrawal: कामाची बातमी! या UPI App मधून काढता येणार PF चे पैसे, वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT