Patna Fire :
Patna Fire :  ANI
देश विदेश

Patna Fire : पटनामध्ये अग्नितांडव! रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला भीषण आग; 6 जणांचा मृत्यू, मदतकार्य सुरु

Vishal Gangurde

पटना : बिहारची राजधानी पटना रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलला आग लागल्याची घटना घडली. गुरुवारी घडलेल्या या भीषण दुर्घेटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. तर या घटनेत १२ हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या दुर्घटनेवर अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकारी शोभा ओहाटकर यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. आम्ही नेहमी 'फायर ऑडिट' करत असतो. विशेषतः दाट लोकवस्तीत ऑडिट करण्यावर आमचा भर असतो. खरं तर हे काम खूपच आव्हानात्मक असते. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत किंवा त्या रोखण्यासाठी आम्ही नेहमीच जनजागृती करत असतो. प्राथमिक अंदाजानुसार, ही आगीची दुर्घटना सिलिंडरच्या स्फोटामुळं घडली असावी. ही आग आता आटोक्यात आणण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी ११ वाजण्याच्या सुमारास पाल हॉटेलला आग लागली. गॅस सिलिंडरमुळे आग ही हॉटेलमध्ये सर्वत्र पसरली. या घटनेनंतर हॉटेलमधील काही जण अग्निशमन यंत्राच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, काही मिनिटानंतर आग सर्वत्र पसरली. हॉटेलला आग लागल्यानंतर आजूबाच्या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळत आहे.

आग लागण्याच्या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने पोहोचले. त्यांनी तातडीने कंकडबाग, लोदीपूर या भागात अग्निबंब आणले. ५१ अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आलं. आग लागल्यानंतर परिसरात एकच बघ्यांची गर्दी जमा झाली. पाल हॉटेलशिवाय पंजाबी नवाबी, बलवीर सायकल स्टोरला ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ३० हून अधिक लोकांना रेस्क्यू करण्यात यश आलं आहे.

हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

प्रत्यक्षदर्शी स्टाफ रंजन यांनी सांगितलं की, 'हॉटेलच्या गॅस सिलिंडरला आग लागली. फास्ट फूड तयार करण्यासाठी नवा सिंलिडर बसविण्यासाठी आणला. मात्र, तो आधीपासून लीक झालेला होता. त्यामुळे हॉटेलमध्ये आग लागली. अग्निशमन यंत्राने आग विझविण्यास प्रयत्न केला, पण आग विझली नाही. त्यानंतर आग वाढल्याने लोक मोठा आवाज हॉटेलच्या बाहेर पळाले. यावेळी एका गॅस सिलिंडरचा ब्लास्ट झाला. हॉटेलमध्ये १० ते १२ गॅस सिलिंडर होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबदेवीच्या दर्शनाला

Paru And Aditya Wedding : 'पारू'च्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, पारू आणि आदित्यचं लग्न होणार पण...

Home Tips: पावसाळा येतोय! तर घरातील लाकडी फर्निचरची घ्या अशी काळजी

Lok Sabha Election: डॉ.मनमोहन सिंह आणि हमीद अन्सारी यांनी घरून केलं मतदान, वयोवृद्ध मतदारांसाठी आयोगाने केली विशेष व्यवस्था

Priyanka Gandhi : माझ्या शहीद आजी आणि शहीद वडिलांना देशद्रोही बोलल्यावर गप्प का बसू? प्रियांका गांधी कडाडल्या

SCROLL FOR NEXT