Gas Cylinder Explosion
Gas Cylinder Explosion  Saam tv
देश विदेश

Gas Cylinder Explosion : जयपुरात ६ गॅस सिलिंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू, घटनेचा व्हिडिओ आला समोर

Vishal Gangurde

Jaipur Gas Cylinder Explosion :

राजस्थानची राजधानी जयपूर गॅस सिलिंडरच्या स्फोटाने हादरलं आहे. जयपूरमधील विद्याधर नगर मंदिराच्या सर्कलजवळ गॅस सिलिंडरच्या स्फोटाची ही घटना घडली आहे. सहा गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन परिसराला आग लागली. या आगीच्या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आहे. (Latest Marathi News)

जयपूरमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटाच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, स्फोटामुळे परिसरात भीषण आग लागली आहे. आगीची घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाचे अग्निबंब घटनास्थळी पोहोचले आहेत. सहा गॅस सिलिंडरचा स्फोट कसा झाला, याबद्दल विशेष माहिती समोर आलेली नाही. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात एक गोंधळ उडाला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गॅस सिलिंडरचा स्फोट झालेल्या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत किती जण जखमी झाले आहेत, याबद्दल माहिती अद्याप समोर आलेली नाही. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये परिसरात धुराचे लोट पसरल्याचे दिसत आहे. तसेच परिसरात काही जण धावपळ करताना दिसत आहेत.

दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी राजस्थानच्या चुरुमध्ये ११ गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. परिसरात लग्न असलेल्या ठिकाणी ही गॅस सिलिंडर स्फोटाची घटना घडली होती. यानंतर परिसरातील घरांना आग लागली होती. आग लागल्याने लग्नघरातील लोकांची एकच धावपळ उडाली होती. आगीमुळे लग्नघरातील लोकांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले होते.

पालघर - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारला भीषण आग

पालघर - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा येथे धावत्या कारला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या मार्गावरील चिंचपाडा येथे धावत्या कारने अचानक पेट घेतला. या कारला शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. मात्र कार जळून खाक झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli News : सांगलीत खासदार कोण? पैज लावणं पडलं महागात!

Lok Sabha Election 2024 : "मुंबईकरांनो, आवर्जुन मतदान करा..."; सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं केलं आवाहन

Faf Du Plessis Catch: उडता फाफ! डू प्लेसिसने हवेत उडी मारत एका हाताने घेतला भन्नाट झेल- Video

Today's Marathi News Live: कल्याणमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज

Sambhajinagar Water Crisis : हर्सूल तलावाने गाठला तळ; केवळ अडीच टक्के साठा शिल्लक

SCROLL FOR NEXT