Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

Shreya Maskar

पितृपक्ष

पितृपक्ष हा असा काळ आहे जेव्हा आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण करतो, प्रार्थना करतो आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी दानधर्म करतो. तुम्हाला काही कारणास्तव तर्पण करता आले नाही, तर जलउपाय करा.

Pitru Paksha | pinterest

तर्पण

जर तुम्ही पितृपक्षात 'तर्पण' (पूर्वजांना (पितरांना) जल वाहून त्यांना तृप्त किंवा संतुष्ट करण्याची पवित्र विधी) करू शकत नसाल, तर पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पाण्याशी संबंधित हे ५ उपाय करणे शुभ मानले जाते.

tarpan | pinterest

सूर्योदय

पितृपक्षात दररोज सूर्योदयाच्या वेळी पाणी अर्पण करा. सकाळी स्नान केल्यानंतर, प्रथम तांब्याच्या भांड्यात एक कप पाणी घ्या. मग दक्षिणेकडे तोंड करून, आपल्या पूर्वजांचे स्मरण करत त्यांना पाणी अर्पण करा. तसेच, कृतज्ञता आणि मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करा.

sunrise | pinterest

काळे तीळ

दररोज पाण्यात काळे तीळ मिसळून ते पाणी आपल्या पूर्वजांना अर्पण करा. आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि भक्तीभावाने ते अर्पण करा.

black sesame | pinterest

पिंपळाचे झाड

पितृपक्षात दररोज पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. असे मानले जाते की, पिंपळाच्या झाडात देव आणि पूर्वज वास करतात. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करताना, आपल्या पूर्वजांचे मनात स्मरण करा.

Pimpal tree | pinterest

पाण्याची व्यवस्था

पितृपक्षात गरजू आणि मजुरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे ही एक अत्यंत पुण्यकारक सेवा मानली जाते. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी, पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर किंवा पाणीपुरवठा सेवेतही योगदान देऊ शकता.

Water | pinterest

जनावरांसाठी पाणी

पितृपक्षात पक्ष्यांसाठी घराबाहेर किंवा गच्चीवर पाणी ठेवा आणि ते नियमितपणे बदला. तसेच, आपल्या क्षमतेनुसार गायी, कुत्रे इत्यादी जनावरांनाही पाणी द्या.

Water for animals | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | pinterest

NEXT : पितृपक्षात दिसणारे 'हे' ५ संकेत मानले जातात शुभ, पितरांचा मिळतो आशीर्वाद अन् अडथळे होतात दूर

Pitru Paksha | AI PHOTO
येथे क्लिक करा...