Opposition vs Jagdeep Dhankhar, Parliament Winter Session 2024 : राज्यसभेत पुन्हा एकदा अविश्वास प्रस्तावाचा मुद्दा गाजला. भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं अविश्वास ठरावाची नोटीस दिली. विरोधी पक्षांनी आरोप केला, राज्यसभेचे सभापती म्हणून सभापतीची कारवाई पार पाडताना जगदीप धनखड पक्षपातीपणा करतात, असा आरोप करतानाच राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरूद्ध अविश्वास प्रस्तावावरून गदारोळ झाला. त्यावेळी धनखड यांनी 'मैं झुकूंगा नहीं' म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात सभागृहात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता. आज सकाळी अधिवेशनाला सुरूवात होताच विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली. याला सत्ताधारी भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. काँग्रेसच्या नोटीसच्या विरोधात भाजप खासदार राधामोहन दास अग्रवाल यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली. त्यानंतर सभागृहातील वातावरण आणखीच तापले. एकच गदारोळ सुरू झाला. काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्याआधी बोलताना भाजप खासदार राधा अग्रवाल म्हणाले, 'काँग्रेसकडून पाठवण्यात आलेली ही नोटीस नियमांच्या विरोधात आहे. १४ दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे.'
काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांचा बचाव केला. यादरम्यान भाजपवरही हल्लाबोल करण्यात आला. ज्यामुळे राज्यसभेत एकच गदारोळ पाहायला मिळाला. गदारोळ सुरू असतानाच सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना सुनावले. ते म्हणाले, 'तुम्हा लोकांना २४ तास एकच काम आहे. या खुर्चीवर शेतकऱ्याचा मुलगा कसा बसला आहे. याचं तुम्हाला दु:ख आहे. मी देशासाठी माझ्या प्राणाची आहुती देईन. पण मी झुकणार नाही. विरोधकांनी संविधानाचे तुकडे केले आहेत.'
'तुम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांचा अपमान करता. तुमचे काम सभागृह चालवणे आहे. तुमची स्तुती ऐकायला आम्ही इथे आलो नाही. तुम्ही शेतकर्याचे पुत्र असाल तर मी मजुराचा मुलगा आहे. तुम्ही माझा आदर करत नसाल तर मी तुमचा आदर का करू?', असा प्रतिसवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला.मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.