BMW Saam Tv
देश विदेश

गोव्यात चालत्या BMW गाडीने घेतला पेट; परिसरात खळबळ

गोव्यातल्या मडगावच्या कोलवा सर्कल परिसरात चालत्या बीएमडब्ल्यू गाडीला (BMW Car Fire) भीषण आग लागली.

अनिल पाटील

पणजी: गोव्यातल्या मडगावच्या कोलवा सर्कल परिसरात चालत्या बीएमडब्ल्यू गाडीला (BMW Car Fire) भीषण आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, ही गाडी आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. गाडीला रस्त्यावरच आग लागल्याने वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. या गाडीला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

रोहन कारेकर यांच्या मालकीची ही बीएमडब्ल्यू गाडी असून तो सुरावली मडगावच्या दिशेने जात असताना, कोलवा सर्कलजवळ पोहचल्यावर अचानक धूर यायला सुरुवात झाली. चालकाच्या लक्षात ही बाब आल्यावर गाडी उभी करुन तो गाडीतून बाहेर आला. त्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी गाडीतील कागदपत्रे तसेच संपूर्ण गाडीच जळून खाक झाली.

आग लागलेली ही बीएमडब्ल्यू गाडी रस्त्यावरच असल्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण झाली. आग लागल्याची माहिती अग्नी शामक दलाच्या जवानांना मिळताच त्वरित घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोंडीमुळे अग्नीशामक दलाच्या गाडीला घटनास्थळी पोहचण्यास उशिर झाला. पोलिसांनी मार्ग सुरळीत केल्यावर अग्नीशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आग विझविली. गाडीला आग लागण्याचे नेमके कारण तसेच या आगीत किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही: सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Maharashtra Live News Update: - पुणे आहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव येथे वाहतुककोंडी

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

शुभमन गिल ठरला जगातला एकमेव खेळाडू; ICC कडून चौथ्यांदा खास पुरस्कार

SCROLL FOR NEXT