Bengaluru Accident Saam Tv
देश विदेश

Bengaluru Accident: बेंगळुरूच्या रस्त्यावर थरार, आलिशान कारनं तरुणीला उडवले

Bengaluru Accident News: बेंगळुरू शहरातून एक धक्कादायक अपघाताची बातमी समोर आली आहे. ज्या घटनेत नेमके काय घडले ते एकदा पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Major accident in Bengaluru : ड्रिंक अँड ड्राइव्हच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यातील भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच, बेंगळुरूच्या रस्त्यावरही असाच थरार घडला. मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव आलिशान कारने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला उडवले. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

बेंगळुरुतील(Bengaluru) केंगेरी येथे हा अपघात झाला. एका भरधाव आलिशान कारने तरुणीला जोरदार धडक दिली. ही तरुणी रस्ता ओलांडत होती. कारची धडक इतकी जोरदार होती की तरुणी(Girl) गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. संध्या असं या ३० वर्षीय तरुणीचं नाव आहे.

चालकाला बदडले!

बेंगळुरूच्या रस्त्यावर भीषण अपघाताचा थरार घडला. आलिशान कारची धडक इतकी जोरात होती की तरुणी जागीच मरण पावली. कारचा चालक दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जाते. त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. संध्या रस्ता ओलांडत होती. तिला अनियंत्रित झालेल्या कारने जोरदार धडक दिली. अपघातानंतर चालक धनुषने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तेथील जमावाने त्याला पकडले आणि चोप दिला.

अपघाताची माहिती मिळताच, केंगेरी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी चालक धनुषला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वृत्तानुसार, धनुषच्या वडिलांनी अलीकडेच ही लक्झरी कार घेतली होती. धनुषचे वडील एका ट्रॅव्हल कंपनीचे मालक आहेत. धनुष आणि त्याचा मित्र कार घेऊन यशवंतपूर येथे दारू पिण्यासाठी गेले होते. दारू प्यायल्यानंतर दोघं म्हैसूर रोडला लाँग ड्राइव्हसाठी गेले होते. तेथून परतत असताना हा भीषण अपघात झाला, अशी माहिती समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT