Gujarat Girl Died Due To Brain Hemorhage Google
देश विदेश

Gujarat News: दहावीत मिळवले ९९.७० टक्के गुण, बोर्डातील टॉपर; निकालानंतर चौथ्या दिवशी विद्यार्थिनीचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू

Gujarat Girl Died Due To Brain Hemorhage :गुजरातमधील एका १६ वर्षीय मुलीचा ब्रेन हॅमरेजमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोरबी येथे ही धक्कादायक घटना घडली होती. हीर घेटिया असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुजरातमधील एका १६ वर्षीय मुलीचा ब्रेन हॅमरेजमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोरबी येथे ही धक्कादायक घटना घडली होती. हीर घेटिया असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. हीरचा काही दिवसांपूर्वीच दहावीचा निकाल लागला होता. हीरने दहावीच्या परिक्षेत ९९.७० टक्के गुण मिळवले होते. परंतु अचानक तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हीरला ब्रेन हॅमरेज झाला होता. महिनाभरापूर्वी तिला राजकोटमधील एका खासगी रुग्णायलयात दाखल करण्यात आले. तिच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. परंतु घरी आल्यावर तिला श्वास घ्यायला आणि हृदयाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तिला पुन्हा आयसीयूमध्ये अॅडमिट करण्यात आले. परंतु तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हीरच्या अचानक जाण्याचे आईवडिलांना खूपच दुःख झाले आहे.

हीरच्या एमआरआयच्या रिपोर्टमध्ये तिचा मेंदू सुमारे ८० ते ९० टक्के काम करणे बंद झाला होते, असे दिसून आले. बुधवारी तिच्या हृदयानेदेखील काम करणे बंद झाले. त्यानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हीर ही अत्यंत हुशार मुलगी होती. तिने दहावीच्या परिक्षेत ९९.७० टक्के गुण मिळवले होते.

हीरच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हीरच्या आईवडिलांनी तिचे अवयव दान करायचे ठरवले आहे. तिच्या आईवडिलांनी वैद्यकीय महाविद्यालयात तिचा मृतदेह दान केला आहे. याबाबत हीरच्या वडिलांनी माहिती दिली आहे. हीरला डॉक्टर व्हायचे होते. त्यामुळे आम्ही तिचे डोळे आणि शरीर दान करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला आशा आहे की, तिचे डोळे घेणाऱ्या व्यक्तीने तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT