एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाले
Everest MDH SpicesSaam Tv

Everest MDH Spices: मोठी बातमी! नेपाळने घातली एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर बंदी, ब्रिटनचीही भारतीय मसाल्यांवर कडक नजर

Nepal Bans Everest MDH Spices Sale: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. नेपाळने एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर बंदी घातली आहे.
Published on

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. नेपाळने एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर बंदी घातली आहे, तर ब्रिटनने देखील भारतीय मसाल्यांवर कडक नजर ठेवण्याची घोषणा केल्याची माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

नेपाळ राज्याचे अन्न तंत्रज्ञान विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये एव्हरेस्ट आणि एमडीएच ब्रँडच्या मसाल्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. या मसाल्यांच्या (Everest MDH Spices) बाजारात विक्रीवरही बंदी घातली आहे. या मसाल्यांमध्ये घातक रसायने असल्याचं समोर आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या दोन्ही ब्रँडच्या मसाल्यांमधील रसायनांची तपासणी सुरू आहे. या तपासणीचा अहवाल येईपर्यंत मसाल्यांवर बंदी कायम राहणार आहे.

सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर आता नेपाळने देखील एव्हरेस्ट आणि एमडीएच या दोन भारतीय मसाल्यांच्या विक्री, वापर आणि आयातीवर बंदी घातल्याची माहिती मिळत आहे. या मसाल्यांमध्ये कीटकनाशक इथिलीन (Nepal Bans Everest MDH Spices) ऑक्साईड नावाचं रसायन असण्याची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. आता या मसाल्यांमधील इथिलीन ऑक्साईडची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

न्यूझीलंडचे अन्न सुरक्षा नियामक विभागाचे कार्यवाहक उपमहासंचालक जेनी बिशप यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या मसाल्यांमध्ये (MDH Spices Sale Britain) इथिलीन ऑक्साईड नावाचं रसायन आहे. त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता आहे. एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाले देखील न्यूझीलंडमध्ये बाजारात विकले जातात. त्यांनी याप्रकरणी अधिक तपास करत असल्याचं सांगितलं आहे.

 एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाले
Spices For Heart Health: जेवणाच्या स्वादासाठी नाही तर आरोग्यासाठीही लाभदायी; नियमित खा ‘हे’ मसाले

हाँगकाँगनंतर सिंगापूरच्या फूड एजन्सीने एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यावर बंदी घातली होती. त्यांनी एव्हरेस्टच्या फिश करी मसालाची ऑर्डर परत केली (Fish Curry Masala) होती. या मसाल्यामध्ये इथिलीन ऑक्साईडचं प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे. संबंधित एजन्सीने म्हटलंय की, सध्या सध्या कमी प्रमाणात इथिलीन ऑक्साईडपासून कोणताही धोका नाही. परंतु, दीर्घकाळ खाल्ल्यामुळे कर्करोगाचा धोका वाढु शकतो.

 एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाले
MDH and Everest Masala : पॅकबंद मसाल्यांमुळे होऊ शकतो कर्करोग? हाँगकाँग, सिंगापूरमध्ये भारतीय मसाल्यांवरील बंदीनंतर FSSAI ची तपासणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com